
Maharashtra Politics: राजकारणात भूकंप? BMC निवडणुकीत 'खेला' होणार, जुहूमधील 35 हजार
जुहूमधील 35 हजार नागरिकांचा मतदानावार बहिष्कार
राज्यात 15 तारखेला मतदान आणि 16 ला निकाल जाहीर होणार
200 इमारतीमधील नागरिकांनी घेतला निर्णय
Mumbai News: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. निवडणूक होणे, मतदान करणे हे बळकट लोकशाहीसाठी आवश्यक असते. राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान त्याआधीच मुंबईतून (BMC Election) एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील तब्बल 35 हजार मतदारांनी मतदानावार बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईतील जुहू परिसरातील तब्बल 35 हजार नागरिक मतदानावार बहिष्कार घालणार असल्याचे समजते आहे. एकीकडे मतदानाची आकडेवारी वाढावी, जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे यासाठी प्रशासन, सरकार प्रयत्न करत असताना 35 हजार नागरिक बहिष्कार घालणार असल्याची बातमी समोर येत आहे.
मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे पोस्टर्स या जुहू परिसरातील इमारतीच्या भागात लावण्यात आल्याचे समजते आहे. गेली 35 वर्षेपासून धोकादायक इमारतींचे पुनर्वसन होऊ शकल्याने येथील नागरिक भीतीच्या छायेकाहलि राहत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान याच कारणांमुळे नागरिकांनी मतदान ण करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक रंगतदार होणार आहे. कॉँग्रेस, भाजप शिवसेना आणि ठाकरे बंधू एकत्रित लढत आहेत. मुख्य लढत ही भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी दिसून येत आहे. शिवाजी पार्कवर काल ठाकरे बंधू यांची सभा पार पडली. त्याच ठिकाणी आज भाजपची सभा होणार आहे. दरम्यान 15 तारखेला मतदान आहे. 16 तारखेला जनता कोणाला कौल देणार हे पहावे लागणार आहे.
ज्योती वाघमारे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
ठाकरे बंधूंची संयुक्त सभा रविवारी शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाषण करत अनेक मुद्दे मांडत मराठी मतदारांसमो ठाकरेंची भूमिका मांडली. तसेच राज आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी भाषणांमध्ये विविध मुद्दे मांडले. याचदरम्यान या सभेवर शिंदे गटातील ज्योती वाघमारे यांनी या सभेवर जोरदार हल्लाबोल केला.
एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे ‘धुरंदर’ नेतृत्व आहेत. याउलट, एक भाऊ जगात कोरोना आला असताना घरात बसून राहणारा ‘दलिंदर’, तर दुसरा ‘खळखट्याक’ची भाषा करणारा ‘बिलंदर’ आहे. महाराष्ट्राची जनता या ‘रहमान डकैत’ प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. कालची सभा म्हणजे विचारांचे मंथन नव्हते, तर आपला परिवार आणि राजकीय अस्तित्व वाचवण्याची केविलवाणी धडपड होती. सभेत लोकांचा उत्साह नव्हता, तर ‘कंटाळवाणी’ भाषणं आणि ‘लाचार’ माणसं दिसत होती, असा घणाघात ज्योती वाघमारे यांनी ठाकरे बंधूवर केला आहे.