निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार भाईंदर पूर्वेच्या प्रभाग ४ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धनेश परशुराम पाटील यांची १४३ कोटी ९५ लाखांची संपत्ती आहे. त्यापैकी तब्बल १४० कोटी ४९ लाख रुपयांची जमीन, सदनिका आदी स्थावर मालमत्ता आहे. मागील निवडणुकीत ३१ कोटी १८ लाखांची संपत्ती दर्शवली होती. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. प्रभाग १२ मधील भाजपचे माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांची मागील निवडणुकीत असलेली ४ कोटी ५५ लाख रुपयांची संपत्ती तब्बल १४ कोटी पर्यंत वाढली आहे. त्यामुळे भाजपाचे प्रभाग ८ मधील सुरेश खंडेलवाल यांची २०१७ मध्ये असलेली ५ कोटी ५७ लाख रुपयांची संपत्ती २५ कोटी ३३ लाख वर पोहचली आहे. भाजपचे ध्रुवकिशोर पाटील यांची संपत्ती ९८ लाखांवरून १ कोटी ८८ लाख झाली आहे. ध्रुवकिशोर राहतात तो आलिशान मोठा फ्लॅट मात्र त्यांच्या भावाच्या नावे आहे. पाटील यांच्या निकटवर्तीय भाजपा उमेदवार ऍड. श्रद्धा कदम यांची संपत्ती तब्बल ५ कोटी ६ लाख आहे.
माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांच्या पत्नी मयुरी यांनी २ कोटी ७ लाख मालमत्ता दाखवली आहे. सचिन यांनी गेल्यावेळी ७४ लाख २५ हजार मालमत्ता दाखवली होती. प्रभाग २३ मधील भ्रष्टाचारच्या गुन्ह्यात ५ वर्षांची शिक्षा झालेल्या भाजपा उमेदवार वर्षा भानुशाली यांची १ कोटी १० लाखांची संपत्ती यंदा ३ कोटी १९ लाखांवर गेली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी लाच घेताना पकडलेले प्रभाग १ मधील भाजपाचे अशोक तिवारी यांची संपत्ती १ कोटी ८१ लाखांवरून तब्बल ६ कोटी ८७ लाख झाली आहे.
भाजपाचे माजी नगरसेवक उमेदवार
प्रभाग १२
माजी महापौर डिम्पल मेहता
२०१७ ची मालमत्ता : २६ कोटी ७८ लाख
२०२६ ची मालमत्ता : ३० कोटी ६८ लाख
प्रभाग ७
ऍड . रवी व्यास
२०१७ ची मालमत्ता : ५ कोटी १५ लाख
२०२६ ची मालमत्ता : १० कोटी ७० लाख
प्रभाग २
शानू गोहिल
२०१७ ची मालमत्ता : ९७लाख
२०२६ ची मालमत्ता : ३ कोटी ३९ लाख
मदन सिंह
२०१७ ची मालमत्तां : १ कोटी २ लाख
२०२६ ची मालमत्तां : २ कोटी ६१ लाख
प्रभाग ३
गणेश शेट्टी
२०१७ ची मालमत्तां :४ कोटी १ लाख
२०२६ ची मालमत्तां : ९ कोटी ७७ लाख
प्रभाग ५
मुन्ना सिंह
२०१७ ची मालमत्तां :४३ लाख
२०२६ ची मालमत्तां :१ कोटी ३ लाख
वंदना मंगेश पाटील
२०१७ ची मालमत्तां :१२ कोटी ११ लाख
२०२६ ची मालमत्तां : १३ कोटी ५२ लाख
प्रभाग ६
सुनीता जैन
२०१७ ची मालमत्तां :३ कोटी १ लाख
२०२६ ची मालमत्तां : १ कोटी ४५ लाख
प्रभाग १४
माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे
२०१७ ची मालमत्तां :४ कोटी ७९ लाख
२०२६ ची मालमत्तां :६ कोटी ८४ लाख
मीरादेवी यादव
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ६० लाख
२०२६ ची मालमत्तां :३ कोटी ६४ लाख
प्रभाग १५
मोहन म्हात्रे
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ७० लाखा
२०२६ ची मालमत्तां : ३ कोटी २८ लाख
सुरेखा सोनार
२०१७ ची मालमत्तां :२ कोटी ७१ लाख
२०२६ ची मालमत्तां :३ कोटी ६४ लाख
प्रभाग १६
वंदना भावसार
२०१७ ची मालमत्तां : ५८ लाख
२०२६ ची मालमत्तां :२ कोटी २ लाख
प्रभाग १७
प्रशांत दळवी
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ७९ लाख
२०२६ ची मालमत्तां :३ कोटी ७१ लाख
दीपिका अरोरा
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ५९ लाख
२०२६ ची मालमत्तां :२ कोटी ४२ लाख
हेमा बेलानी
२०१७ ची मालमत्तां :६ कोटी १५ लाख
२०२६ ची मालमत्तां :९ कोटी १० लाख
प्रभाग १८
नीला सोन्स
२०१७ ची मालमत्तां :५ कोटी ६२ लाख
२०२६ ची मालमत्तां :११ कोटी २८ लाख
प्रभाग २०
दिनेश जैन
२०१७ ची मालमत्तां :२ कोटी २ लाख
२०२६ ची मालमत्तां :५ कोटी ५ लाख
हेतल परमार
२०१७ ची मालमत्तां :३५ लाख
२०२६ ची मालमत्तां :१ कोटी १७ लाख
प्रभाग २१
मनोज दुबे
२०१७ ची मालमत्तां :२ कोटी ९१ लाख
२०२६ ची मालमत्तां :६ कोटी ६५ लाख
अनिल विराणी
२०१७ ची मालमत्तां :३ कोटी २० लाख
२०२६ ची मालमत्तां :४ कोटी ६ लाख
प्रभाग २३
जयेश भोईर
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी १२ लाख
२०२६ ची मालमत्तां :२ कोटी २८ लाख
भाजपाच्या माजी नगरसेवक बंडखोरांची संपत्ती पण वाढलेली
प्रभाग १
रिटा शाह
२०१७ ची मालमत्तां :३ कोटी ३७ लाख
२०२६ ची मालमत्तां :५ कोटी ३८ लाख
प्रभाग ४
गणेश भोईर
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ५६ लाख
२०२६ ची मालमत्तां : २ कोटी ३ लाख
प्रभात पाटील
२०१७ ची मालमत्तां :३ कोटी ६५ लाख
२०२६ ची मालमत्तां : ५ कोटी ९९ लाख
प्रभाग ५
डॉ. प्रीती पाटील
२०१७ ची मालमत्तां :३४ कोटी ७१ लाख
२०२६ ची मालमत्तां :४३ कोटी ५४ लाख
सुनीता भोईर
२०१७ ची मालमत्तां : ६१ लाख
२०२६ ची मालमत्तां :७ कोटी ७ लाख
प्रभाग ९
नरेश पाटील
२०१७ ची मालमत्तां :५५ लाख
२०२६ ची मालमत्तां : १ कोटी ५४ लाख
शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेदवार
प्रभाग ८
माजी महापौर कॅटलीन परेरा
२०१७ ची मालमत्तां : ६ कोटी ७५ लाख
२०२६ ची मालमत्तां :१४ कोटी ६३ लाख
प्रभाग १०
तारा विनायक घरत
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ८७ लाख
२०२६ ची मालमत्तां :५ कोटी ५३ लक्ष
प्रभाग ११
वंदना आणि विकास पाटील
२०१७ ची मालमत्तां : ६ कोटी ३१ लाख
२०२६ ची मालमत्तां :११ कोटी ८१ लाख
प्रभाग १५
कमलेश भोईर
२०१७ ची मालमत्तां :७८ लाख
२०२६ ची मालमत्तां :१ कोटी २९ लाख
प्रभाग १६
भावना व राजू भोईर
२०१७ ची मालमत्तां :११ कोटी
२०२६ ची मालमत्तां :१३ कोटी ३० लाख
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रभाग ३ मधील उमेदवार नीलम ढवण यांची मालमत्ता देखील
२०१७ ची मालमत्तां :१ कोटी ९० लाख
२०२६ ची मालमत्तां :४ कोटी ६३ लाख
एकीकडे सर्वसामान्य नागरिक महागाई, करभार आणि मूलभूत सुविधांसाठी झगडत असताना लोकप्रतिनिधींच्या संपत्तीतील ही ‘उत्तुंग भरारी’ मतदारांसाठी चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरत आहे. येत्या निवडणुकीत मतदार या संपत्तीवाढीचा हिशेब मतपेटीतून देतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






