
kalagourav sohla
हा भव्य पुरस्कार सोहळा येत्या बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता मुंबईतील प्रसिद्ध रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे पार पडणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बारामतीच्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे उपस्थित राहणार असून, संस्थाध्यक्ष तथा भजनसम्राट कोयनारत्न ह.भ.प. राजाराम बुवा शेलार तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
यंदाच्या ‘कलागौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित होणाऱ्या विशेष मान्यवरांमध्ये पुण्याचे गुणवंत कामगार श्री. रवींद्र हनुमंत चव्हाण, क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी पुण्याचे श्री. युवराज दिसले आणि बारामतीचे ख्यातनाम समाजसेवक डॉ. राजेंद्र भवाळकर यांचा समावेश आहे. या सर्वच मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि समाजोपयोगी योगदानाबद्दल त्यांना हा बहुमान प्रदान केला जाणार आहे.
संस्थेच्या वतीने या विशेष सोहळ्यास सर्व सुजाण नागरिक, कलाप्रेमी व प्रतिष्ठान परिवारातील सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि हा क्षण स्मरणीय बनवावा, असे नम्र आवाहन संस्थाध्यक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.