लिफ्ट वापरण्याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आल्या आहेत (फोटो - AI)
महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार, यापुढे १२ वर्षांखालील लहान मुलांना पालकांशिवाय किंवा मोठ्या व्यक्ती सोबत असल्याशिवाय लिफ्टचा वापर करण्याबाबत बंदी घालण्यात आली आहे. १ नोव्हेंबर २०२६ पासून ‘महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉक, २०२६’ ही नवी नियमावली लागू झाली आहे. त्यामुळे आता लहान मुलांना एकट्याने लिफ्टमध्ये जाण्यास किंवा एस्केलेटर वापरण्यास परवानगी असणार नाही. या नियमांमुळे गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक इमारती आणि लिफ्टची देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांवरही मोठी जबाबदारी आली आहे.
Shirdi Taaj Five star Hotel : साईभक्तांसाठी मोठी बातमी! शिर्डीत उभारले जाणार पंचतारांकित ताज हॉटेल
मुंबई. ठाणे व पुण्यासारख्या वाढत्या शहरांमध्ये इमारतीची उंची आणि मजल्यांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. मोठमोठ्या इमारती आणि गगनचुंबी संकुलांची वाढ झाल्याने लिफ्टचा वापर वाढला आहे. मात्र अनेकदा याचा फटका लहान मुलांना बसत असल्याने यापुढे योग्य ती काळजी घेण्यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे. १ नोव्हेंबर २०२६ पासून ‘महाराष्ट्र लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉक, २०२६’ ही नवी नियमावली लागू झाली आहे.
‘मुंबई विकायला काढली आहे का?’; महापालिकेतील बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
नव्या नियमांनुसार, लिफ्ट किंवा एस्केलेटरचा वापर करताना १२ वर्षांखालील मुलांसोबत पालक किंवा एखादी मोठी व्यक्ती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता लहान मुलांना एकट्याने लिफ्टमध्ये जाण्यास किंवा एस्केलेटर वापरण्यास परवानगी असणार नाही. याशिवाय लिफ्ट किंवा एस्केलेटरशी संबंधित कोणताही अपघात झाल्यास त्याची माहिती २४ तासांच्या आत विद्युत निरीक्षक आणि स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक असणार आहे. त्याचबरोब लिफ्टमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंचलित बचाव उपकरणे बसवण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
या नव्या नियमांमुळे गृहनिर्माण सोसायट्या, व्यावसायिक इमारतींचे व्यवस्थापन तसेच लिफ्टची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदारांवरही सुरक्षिततेची मोठी जबाबदारी आली आहे. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालकांनीही लिफ्टचा वापर करताना अधिक काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे.
Ans: नव्या नियमांनुसार १२ वर्षांखालील मुलांसोबत पालक किंवा एखादी मोठी व्यक्ती असणे आवश्यक आहे.
Ans: लिफ्ट किंवा एस्केलेटरशी संबंधित अपघाताची माहिती २४ तासांच्या आत विद्युत निरीक्षक आणि स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक आहे.
Ans: लिफ्टमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्वयंचलित बचाव उपकरणे बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. या सुविधा उपलब्ध करण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.






