आता म्हाडाचं घर घेणं झालं सोपं! कोकण मंडळ स्वतः मिळवून देणार गृहकर्ज (Photo Credit- X)
रिक्त घरे विकण्याचे उद्दिष्ट
सर्वच्या सर्व रिक्त घरे येत्या सहा महिन्यात विकण्याचे उद्दिष्ट आता कोकण मंडळाने ठेवले आहे. त्यानुसार बुक माय होमसह इतर पर्यायाद्वारे करण्यात येणाऱ्या विक्रीला चालना देण्यासाठी आता मंडळाने गृहकर्ज सल्लागाराची नियुक्ती केली आहे. या सुविधेमुळे नक्कीच येत्या काळात मोठ्या संख्येने इच्छुक कोकण मंडळातील घराच्या खरेदीसाठी पुढे येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

अनेक ठिकाणची घरे विक्रीवाचून पडून
या सर्व ठिकाणच्या घरांना इच्छुकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने हजारोंच्या संख्येने घरे विक्रीवाचून रिक्त पडून आहेत. घरे महागडी असल्याने किवा प्रकल्पात आवश्यक त्या सुविधा नसल्याने, प्रकल्पाचे ठिकाण योग्य नसल्याने नागरिकांनी घरांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळेच कोकण मंडळातील अंदाजे २० हजार घरे पडून होती. घरे विकली जात नसल्याने मंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडा प्राधिकरणाने नवीन धोरण स्वीकारून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर बुक माय होमची संकल्पना आणली. घरांच्या विक्रीसाठी त्रयस्थ कंपन्यांची नियुक्ती केली.