NMIA Flight News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ऐतिहासिक उड्डाणासाठी सज्ज! 'या' दिवशी होणार पहिले उड्डाण
NMIA Flight News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील अत्याधुनिक ग्रीनफिल्ड विमानतळ असलेली यशस्वी उभारणी असून भारताच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी लिहावा असा अध्याय जोडला आहे. सिडकोची दूरदृष्टी, चिकाटी आणि सक्षम अंमलबजावणीचे हे भव्य प्रतीक असून, २५ डिसेंबरला येथून पहिली विमानसेवा सुरू होत आहे. नवी मुंबई, महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. या बाबत बोलताना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, विजय सिंघल म्हणाले, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास प्रारंभ होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोची पायाभूत सुविधा विकासाबाबतची सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करते. हा प्रकल्प सिडकोच्या बांधिलकीची हमी देत असून भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि जागतिक स्तरावरील कनेक्टिव्हिटीसाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करतो.
हेही वाचा: India Post Office: आता, फक्त पत्रेच नाही तर झाली डिजिटल क्रांती, डिजिटल योद्धा बनला ‘पोस्टमन’
महाराष्ट्र शासनाने सिडकोसोबत मिळून या ऐतिहासिक प्रकल्पासाठी आवश्यक ठरलेला उत्कृष्ट समन्वय आणि सामायिक दूरदृष्टी याची दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासन, सिडको, अदानी समूह आणि एनएमआयएल यांच्यातील सुरळीत व प्रभावी समन्वयामुळे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आधुनिक पायाभूत सुविधांचा एक मानदंड ठरला असून, महाराष्ट्र व देशासाठी अभिमानास्पद नवे प्रवेशद्वार म्हणून उभे राहिले आहे. हे विमानतळ कायर्यान्वित झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुलभ होणार आहे. यामुळे स्थानिक व्यवसायाला देखील चालना मिळेल. हे विमानतळ म्हणजे जनतेच्या स्वप्नाची पूर्तता आहे.
हेही वाचा: Todays Gold-Silver Price: चांदीने घेतली उसळी, सोन्याचे दर काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर
सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कमळाकृती संकल्पनेवर आधारित अत्यंत आकर्षक टर्मिनल रचनेसाठी अदानी समूह, तसेच एनएमआयएएल यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ही भव्य रचना आता विमानतळाची एक प्रभावी वास्तुशिल्पीय ओळख बनली असून, भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडविण्यासोबतच शाश्वत विकास, नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक ठरतो.
पहिले वेळापत्रक
पहिले उड्डाण: २५ डिसेंबर २०२५
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिल्या दिवशी एकूण ३० एअर ट्रैफिक मूव्हमेंट्स असून यामध्ये इंडिगो, एअर -इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर व स्टार एअर या विमान कंपन्यांचा समावेश आहे.






