Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सक्षम कौशल्य जनगणना’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

सीएसआर-समर्थित प्रशिक्षण भागीदारी, सातत्यपूर्ण नियोक्ता सहभाग, नियमित रोजगार मेळावे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित धोरणात्मक विश्लेषणामुळे रोजगारनिर्मितीची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लक्ष्याधारित झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2026 | 06:33 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सक्षम कौशल्य जनगणना’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सक्षम कौशल्य जनगणना’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
  • देशातील पहिला एआय-सक्षम हायपरलोकल कौशल्य जनगणना उपक्रम
  • स्वयंरोजगाराच्या संधींसाठी सविस्तर कौशल्य डेटा तयार करण्याचा उद्देश
मुंबई: मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या ‘सक्षम कौशल्य जनगणना’ या अभिनव उपक्रमाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री मंडळातील सदस्य,मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई उपनगर चे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यावेळी उपस्थित होते.

‘सक्षम कौशल्य जनगणना’ हा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला देशातील पहिला एआय-सक्षम हायपरलोकल कौशल्य जनगणना उपक्रम आहे. रोजगार, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधींसाठी सविस्तर कौशल्य डेटा तयार करण्याचा उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत सुमारे ५९,८२४ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ४४,९८२ उमेदवारांची नोंद, १,०१८ नियोक्ते आणि ५२ प्रशिक्षण संस्थांचा सहभाग नोंदविण्यात आला आहे. या सर्वेक्षणातून बेरोजगार, कौशल्यवृद्धी इच्छुक, स्वयंरोजगारासाठी इच्छुक, तसेच गृहिणींसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती संकलित करण्यात आली आहे.

अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार; ‘राष्ट्रसेवा, राष्ट्रवाद आणि समर्पणाचा गौरव’ – मुख्यमंत्री फडणवीस

‘सक्षम कौशल्य जनगणना’मुळे उपजीविका आणि रोजगारनिर्मितीला नवी दिशा
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या ‘सक्षम कौशल्य जनगणना’ या अभिनव उपक्रमामुळे रोजगार, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार क्षेत्रात महत्त्वपूर्ण परिणाम दिसून येत आहेत. या जनगणनेतून रोजगारक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यातील तफावत स्पष्ट झाली असून, भविष्यातील नियोजनासाठी भक्कम पाया तयार झाला आहे.

जनगणनेदरम्यान सर्वेक्षण करण्यात आलेल्या जवळपास ९८ टक्के नागरिकांकडे औपचारिक कौशल्य प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. रोजगारक्षमता आणि कार्यबलाच्या औपचारिकीकरणातील ही मोठी दरी भरून काढण्यासाठी ‘सक्षम’ उपक्रम प्रभावी ठरत आहे. सर्वेक्षणानंतर ३२ हजारांहून अधिक उमेदवारांना वैयक्तिकृत करिअर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. बाजारपेठेच्या गरजांनुसार २२ हजारांहून अधिक उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षणाशी जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय ५ हजार ८०० हून अधिक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधींशी जोडण्याची प्रक्रिया सुरू असून, १ हजार ६९० हून अधिक उमेदवारांशी नियोक्त्यांनी मुलाखती व भरतीसाठी थेट संपर्क साधला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘सक्षम कौशल्य जनगणना : सक्षम युवक, सक्षम राज्य’ या कॉफी टेबल बुकचे, तसेच ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026’ च्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले.… pic.twitter.com/hGrWXPnqtt — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 4, 2026

स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी ४ हजारांहून अधिक इच्छुक उद्योजकांना संरचित प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि व्यवसाय सल्ला दिला जाणार आहे. तसेच ६ हजारांहून अधिक गृहिणी, दिव्यांग व्यक्ती आणि समाजातील वंचित घटकांना औपचारिक उपजीविका, कौशल्य प्रशिक्षण आणि स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे. सीएसआर-समर्थित प्रशिक्षण भागीदारी, सातत्यपूर्ण नियोक्ता सहभाग, नियमित रोजगार मेळावे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित धोरणात्मक विश्लेषणामुळे रोजगारनिर्मितीची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लक्ष्याधारित झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई उपनगरचे वार्षिक कौशल्य व रोजगार उद्दिष्ट ८०० ते १,००० उमेदवारांचे असताना, ‘सक्षम’च्या एका पथदर्शी वॉर्ड प्रकल्पातूनच सुमारे २२ हजार उमेदवारांसाठी उपजीविका  तयार करण्यात आली आहे.

‘सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकर…’; काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात वॉर्डस्तरीय साप्ताहिक रोजगार मेळावे, नियोक्त्यांच्या सहभागातून क्षेत्रनिहाय अल्पकालीन व दीर्घकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच स्वयंरोजगार इच्छुकांना पीएमईजीपी, मुद्रा, यांसारख्या योजनांशी जोडण्यावर भर दिला जाणार आहे. व्यवसाय नियोजनासाठी मेंटर गटांची स्थापना, उद्योजकता इनक्युबेशन केंद्रांशी भागीदारी, सातत्यपूर्ण कौशल्य डेटाबेस अद्ययावत ठेवणे, प्रत्येक उमेदवाराला करिअर मार्गदर्शन देणे आणि विविध शासकीय अप्रेंटिसशिप व रोजगार योजनांशी उमेदवारांना जोडण्याची कार्यवाही ही हाती घेण्यात येणार आहे. या सर्व कार्यवाहीची माहिती कॉफी टेबल बुक मध्ये आहे.

Web Title: Launch of the saksham skill census coffee table book at the hands of cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Census
  • CM Devendra Fadnavis
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
1

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
2

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
3

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात
4

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.