Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई…’, राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Devendra Fadnavis: राज्य सरकारच्या वतीने राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाला सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित नागरिक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत मुख्यमंत्र्यांनी नशामुक्त महाराष्ट्र घडविण्याची शपथ घेत व्यसनमुक्त समाजाचा संदेश दिला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 30, 2026 | 12:37 PM
'एकत्र काम केल्यास 2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई...', राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

'एकत्र काम केल्यास 2 ते 4 वर्षात ड्रग्ज फ्री मुंबई...', राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

Follow Us
Follow Us:
  • राज्य सरकारच्या नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ
  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
  • राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाला सुरुवात
Devendra Fadnavis on Drug Free Mumbai: राज्यात व्यसनाधीनतेविरोधात जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाला सुरुवात केली आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यभर व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करत व्यसनमुक्त समाज निर्माण करणे ही केवळ सरकारची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. युवकांना व्यसनाच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी जनजागृती, समुपदेशन आणि सामाजिक सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘ड्रग्स फ्री मुंबई’ मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवणार! काय म्हणाले …

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींसोबत नशामुक्तीची शपथ घेतली. कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करणार नाही, इतरांनाही त्यापासून दूर राहण्यास प्रोत्साहित करू आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सक्रिय सहभाग घेऊ, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. राज्य सरकारच्या या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. व्यसनमुक्तीबाबत जनजागृती, समुपदेशन शिबिरे, प्रबोधनपर उपक्रम आणि विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

व्यसनमुक्त, निरोगी आणि सुरक्षित महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे अभियान राज्यभर व्यापक स्वरूपात राबविले जाणार असून, समाजातील सर्व घटकांनी त्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

BEST, मेट्रो स्थानकांवरही प्रचार

‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी BEST बस, बसथांबे आणि मेट्रो स्थानकांवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देशही आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

ऑनलाईन शपथ आणि प्रमाणपत्राची सुविधा

या अभियानात सहभागी होण्यासाठी drugfreemumbai.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर नोंदणी करून नशामुक्तीची शपथ घेतल्यानंतर तात्काळ डिजिटल प्रमाणपत्र देखील उपलब्ध होणार आहे.

व्यसनमुक्त मुंबईकडे महत्त्वाचे पाऊल

शाळा, महाविद्यालये, पालक, शिक्षक, आरोग्य क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागातून व्यसनमुक्त, सुरक्षित आणि निरोगी मुंबई घडविण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. तरुणाईला योग्य मार्गदर्शन, समुपदेशन आणि सामाजिक पाठबळ देऊन अमली पदार्थांपासून दूर ठेवण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

“नशामुक्त मुंबईसाठी महाराष्ट्र दिनापासून…”; काय म्हणाले Mangal …

Web Title: Maharashtra government launches statewide drug free campaign cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Mumbai

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला
1

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन
2

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
3

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
4

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.