Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात नवीन RTO कार्यालयांसाठी मोठा निर्णय; परिवहन विभागाचे नवे निकष निश्चित

Maharashtra new RTO offices: राज्यातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा अधिक जलद आणि सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयांसाठी निकष निश्चित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 16, 2026 | 12:03 PM
ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य

ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान प्रताप सरनाईकांचे मोठे वक्तव्य

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात नवीन RTO कार्यालयांसाठी मोठा निर्णय
  • परिवहन विभागाचे नवे निकष निश्चित
  • नागरिकांच्या सोयीला प्राधान्य
मुंबई : राज्यातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा अधिक जलद, सुलभ आणि त्यांच्या जवळ उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात वाढती वाहनसंख्या, नागरिकांची वाढती गरज आणि प्रशासनावरील ताण लक्षात घेऊन नवीन प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये स्थापन करण्यासाठी निकष निश्चित करण्यात आले आहेत. परिवहन विभागाने यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने सादर केलेला अहवाल शासनाकडे पाठविला असून, त्यामधील शिफारसींना तत्त्वतः मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निर्णयामुळे राज्यातील दुर्गम व वाढत्या शहरी भागांतील नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन तपासणी, कर भरणा आणि इतर सेवांसाठी दूरच्या कार्यालयांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

रिक्षाचालकांची मनमानी थांबणार! Pune RTO ची ‘इतक्या’ चालकांवर कारवाई; जादा भाडे आकारल्यास…

नागरिकांच्या सोयीला प्राधान्य

नवीन कार्यालय स्थापन करण्यासाठी वाहनसंख्या, लोकसंख्या, महसूल, भौगोलिक अंतर आणि उपलब्ध पायाभूत सुविधा यांसारखे स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात किमान चार तालुके, पाच लाखांहून अधिक वाहने, सात लाखांहून अधिक लोकसंख्या आणि वार्षिक 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल असणे आवश्यक राहणार आहे.

याशिवाय, विद्यमान परिवहन कार्यालयापासून 50 किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असलेल्या भागांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पूर्ण कार्यालयाची आवश्यकता नसेल, तेथे नागरिकांच्या सोयीसाठी स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र (ATS) आणि स्वयंचलित वाहन चालक चाचणी केंद्र (ADTT) उभारण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

विकासाला मिळणार गती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत सेवा मिळणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. वाहनसंख्येत झालेली मोठी वाढ लक्षात घेता परिवहन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. नवीन कार्यालयांमुळे नागरिकांचा वेळ, खर्च आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होईल.”

रोजगारनिर्मितीलाही चालना

नवीन प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांच्या स्थापनेमुळे प्रशासनिक सुविधा वाढण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा केंद्रांमुळे परिवहन व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. राज्यभरातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन परिवहन विभागाच्या विस्ताराचा हा निर्णय नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असून, महाराष्ट्राच्या परिवहन व्यवस्थेला अधिक सक्षम आणि लोकाभिमुख बनविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Driving Licence : वयाच्या 50 वर्षांपर्यंत लायसन्स होणार वैध; RTO चे टेन्शन संपले, सर्व सेवा घरबसल्या ऑनलाइन होणार

Web Title: Maharashtra new rto offices criteria transport department pratap sarnaik 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik
  • RTO

संबंधित बातम्या

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
1

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी; सक्तीच्या धर्मांतरावर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Gondiya: चक्क ६३६ शाळा इमारती जीर्ण! गळते छत, तडे गेलेल्या भिती, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप
3

Bhandara News: ४१५ वर्गखोल्या धोकादायक! दुरुस्तीची कासवगती; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, पालकवर्गातून संताप

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती
4

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.