पुणे आरटीओची मोठी कारवाई (फोटो- सोशल मीडिया)
पुणे आरटीओची धडक कारवाई
९ ऑटोरिक्षा चालकांचे परवाने निलंबित
४८४ दोषी चालकांवर दंडात्मक कारवाई
पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे यांच्याकडून मे महिन्यात १ हजार ३३६ ऑटोरिक्षा चालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तब्बल ४८४ रिक्षाचालक दोषी आढळले आहेत. या दोषी चालकांवर आरटीओकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय ९ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
प्रवाशांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी (Pune News) आरटीओ कार्यालयाकडून ८२७५३३०१०१ हा व्हॉट्सॲप हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रवाशांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने भाडे नाकारणे, जादा भाडे आकारणे, क्षमतेपेक्षा जादा प्रवासी बसवणे, मीटर फास्ट असणे आणि प्रवाशांसोबत उद्धट वर्तन करणे यांसारख्या तक्रारींचा समावेश आहे. प्रवाशांच्या या तक्रारींची गंभीर दखल घेत आरटीओ प्रशासनाने परवाना निलंबन आणि दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
कारवाईची आकडेवारी
• तपासलेली एकूण वाहने: १,३३६
• दोषी आढळलेली वाहने: ४८४
• वसूल केलेला दंड: १,६०,००० रुपये
पुणे आरटीओ ‘मालामाल’; 2025-26 मध्ये तब्बल 1922 कोटींची वसुली, महसूलात मोठी वाढ
प्रवाशांची ऑटोरिक्षा चालकांकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास, त्यांनी आरटीओने जारी केलेल्या क्रमांकावर आपल्या तक्रारीची तात्काळ नोंद करावी. त्यानंतर तक्रारीच्या स्वरूपानुसार संबंधित चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
पुणे आरटीओ ‘मालामाल’
प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) सन 2025-26 मध्ये 1922 कोटी रुपये महसूल वसूल केला असून, राज्य शासनाकडून पुणे आरटीओला मोटार वाहन कर व शुल्क याकरिता १८९५.१७ कोटींचे उदिष्टे देण्यात आले होते. आरटीओला दिलेल्या महसूल वसूलीचे उदिष्टे १०१.४२ टक्के पूर्ण झाले.
Pune RTO साठी ई-लिलाव ठरला फायदेशीर; प्राप्त झाला तब्बल 1 कोटींचा महसूल
यामध्ये रस्ता सुरक्षा अंमलबजावणी पथकांद्वारे तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या एकूण १६ हजार ५०१ वाहनांना ई-तपासणी अहवालाव्दारे जारी करण्यात आली. यातून २५ कोटी ६८ लाख रुपये महसूल वसूल करण्यात आले. तसेच कार्यालयामार्फत एकूण १ लाख ८६ हजार ८२४ वाहन चालक परवाना जारी करण्यात आले असून, ५ हजार ५८४ आंतरराष्टीय वाहन परवाने देण्यात आले.






