Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahayuti Mumbai Manifesto : महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध; मराठी माणसांसाठी केल्या ‘या’ खास घोषणा

मुंबईसाठी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महायुतीचा वचननामा सीएम देवेंद्र फडणवीस आणि डीसीएम एकनाथ शिंदेंनी प्रसिद्ध केला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 11, 2026 | 02:15 PM
Mahayuti-BJP's Mumbai manifesto released for the BMC elections 2026

Mahayuti-BJP's Mumbai manifesto released for the BMC elections 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • महायुतीचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध
  • मुंबईच्या वचननामामध्ये महायुतीकडून वचनांची खैरात
  • मुंबईकरांचा प्रवास सुलभ होण्यासाठी करणार प्रयत्न
Mahayuti Mumbai Manifesto : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Maharashtra Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आला असून जाहीरनामा प्रसिद्ध केला जात आहे. मुंबईवर (BMC Elections 2026) वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. देशाची अर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईवर आपल्याच पक्षाचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपसह महायुतीने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला असून मुंबईकरांवर आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

महायुतीचा जाहीरनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे प्रमुख रामदास आठवले, मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षातील मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये महिलांना खास आश्वासने आणि योजना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चाकरमानी मुंबईकराच्या प्रवासासाठी अनेक निर्णय घेतले जातील असे आश्वासन देण्यात आले आहे. जाहीरनाम्यामध्ये लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सोयीसाठी तीन डब्बे वाढवण्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर एसीचे डबे करुन सेकंड क्लासच्या तिकीटात वाढ करणार नाही. २१ ठिकाणी जेट्टी तयार करणार. वॉटर टॅक्सी आणणार आहोत. स्वस्तात प्रवास करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

हे देखील वाचा : लाडक्या बहिणी’पासून पर्यावरण प्राधिकरणापर्यंत; महायुतीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार

त्याचबरोबर आता एका तिकीटावरून मेट्रो, मोनो, रेल्वे बसमधून जाता येतं. आता याच तिकीटावरून वॉटर टॅक्सीतून जाता येणार आहे. यामुळे सामान्य नोकरदार मुंबईकराचा वेळ वाचेल. तसेच मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रयत्न करणार असून सिमेंटचे रस्ते बांधण्यावर जोर देण्यात येणार आहे. तसेच पुढचे ३०-४० वर्ष रस्त्यांवर कधीच खड्डे पडणार नाही अशी उपाययोजना असल्याचे देखील महायुतीच्या वचननाम्यामध्ये सांगण्यात आले आहे.

हे देखील वाचा : पुणेकरांचा नाद नाही! लाडक्या बहिणींच्या पैशांचा उल्लेख करत मागितले मत; थेट केली आमदारांविरोधात तक्रार

याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईतील मराठी माणूस हा मुद्दा गाजला आहे. यासाठी महायुतीने आपल्या वचननाम्यातून योजनांची खैरात वाटली. महायुतीच्या वचननाम्यामध्ये मराठी माणसांसाठी खास उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या काही वर्षात मुंबईतील मराठी माणूस हा उपनगरात गेला आहे. त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पुनर्विकास राबवताना येणारे अडथळे दूर केले आहे. एसआरए, म्हाडाच्या इमारती, सेसच्या इमारती, नॉन सेसच्या इमारतीचा निर्णय घेतला आहे. पाणीपट्टीत दरवर्षी ८ टक्के वाढ होते. आम्ही पाच वर्षासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईला प्रदूषण मुक्त करण्याचं काम केलं आहे. मुंबई खड्डे मुक्त करणार आहोत. आम्ही फक्त मांडून थांबणार नाही. त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

Web Title: Mahayuti bjp shivsena mumbai manifesto released for the bmc elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • devendra fadnavis
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न
1

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
2

Mumbai Political News: उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे, कोणाला हाताळणे सोपे? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

DPC funds : ‘डीपीसी’चा निधी मुख्यमंत्र्यांकडून रद्द; नांदेडच्या भाजप नेत्यांना मोठा धक्का
3

DPC funds : ‘डीपीसी’चा निधी मुख्यमंत्र्यांकडून रद्द; नांदेडच्या भाजप नेत्यांना मोठा धक्का

Maithili Thakur :बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर प्रचारासाठी मुंबईच्या मैदानात; उत्तर भारतीयांच्या मतांसाठी महायुतीची तिरपी चाल
4

Maithili Thakur :बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर प्रचारासाठी मुंबईच्या मैदानात; उत्तर भारतीयांच्या मतांसाठी महायुतीची तिरपी चाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.