Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई होणार ‘ड्रग्ज मुक्त’! सरकार ॲक्शन मोडमध्ये; Mangal Prabhat Lodha यांच्याकडे असणार ‘ही’ जबाबदारी

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत ड्रग्जविरोधात समन्वित आणि संघटित मोहीम उभारली जाणार असून, २१ जूनपासून सुरू होणाऱ्या या अभियानाकडे सामान्य नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 31, 2026 | 08:32 PM
मुंबई होणार ‘ड्रग्ज मुक्त’! सरकार ॲक्शन मोडमध्ये; Mangal Prabhat Lodha यांच्याकडे असणार ‘ही’ जबाबदारी
Follow Us
Follow Us:

ड्रग्ज फ्री मुंबईसाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे जबाबदारी
ड्रग्ज फ्री मुंबईसाठी उच्चस्तरीय समिती
मुंबईसाठी १२ कलमी कार्यक्रम राबविणार

मुंबई: गोरेगाव येथील नेस्को ग्राऊंड येथील एका संगीत कार्यक्रमातील ड्रग्जबळीनंतर राज्य सरकारने ड्रग्ज मुक्त मुंबईसाठी विशेष उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना या उच्चस्तरीय समितीची जबाबदारी देण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून मुंबईत १२ कलमी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या १२ कलमी कार्यक्रमास येत्या २१ जूनपासून सुरुवात होणार असून यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस परिमंडळात स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गोरेगाव येथील संगीत कार्यक्रमा दरम्यान ड्रग्ज प्रकरणात तरुणांचा झालेल्या मृत्यूनंतर मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून यासंदर्भात दखल घेण्याची मागणी केली होती. लोढा यांच्या या पत्रानंतर राज्य सरकारच्यावतीने उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी लोढा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या समितीची एक बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत मुंबईत १२ कलमी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

“शासन, समाजाने नशामुक्तीचा संदेश …”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?

जून २०२६ ते जून २०२७ या कालावधीत मुंबईभर १२ विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत. याची सुरुवात २१ जूनपासून घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धेने होईल. त्यानंतर जुलैमध्ये सोशल मीडियावर रील स्पर्धा, ऑगस्टमध्ये शाळा-महाविद्यालयांत नशामुक्ती शपथ, सप्टेंबरमध्ये स्ट्रीट प्ले, ऑक्टोबरमध्ये गांधी जयंतीनिमित्त शहरव्यापी रॅली, नोव्हेंबरमध्ये ‘ड्रग-फ्री मुंबई फेस्ट’, डिसेंबरमध्ये युवा संवाद, जानेवारीत ‘नो ड्रग्स झोन’ मोहीम, फेब्रुवारीत निबंध स्पर्धा, मार्चमध्ये फिटनेस मॅरेथॉन, एप्रिलमध्ये यशोगाथा मांडणी आणि मेमध्ये उत्कृष्ट वॉर्ड व कॅम्पस पुरस्कार असे कार्यक्रम होणार आहेत.

या मोहिमेचे घोषवाक्य ‘नशामुक्त मुंबई, सुरक्षित भविष्य’, ‘आपली मुंबई, नशामुक्त मुंबई’ आणि ‘ मुंबई अंगेन्स्ट ड्रग्ज (मॅड) असे ठेवण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट क्षेत्र, धार्मिक संस्था, सेलिब्रिटी आणि रहिवासी संघटनांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. याबद्दल मंत्री लोढा म्हणाले की, ड्रग्जविरोधातील लढा केवळ पोलिस कारवाईने जिंकता येणार नाही. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून जनचळवळ उभी करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला तातडीने मान्यता देत उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, आता मुंबईला ड्रग्जमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत ड्रग्जविरोधात समन्वित आणि संघटित मोहीम उभारली जाणार असून, २१ जूनपासून सुरू होणाऱ्या या अभियानाकडे सामान्य नागरिकांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी यानिमित्ताने केले.

“महाराष्ट्र व दक्षिण कोरियात झालेल्या सामंजस्य…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केले मत

स्वतंत्र समन्वय समिती
या मोहिमेसाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस परिक्षेत्रात स्वतंत्र समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. या समित्यांमध्ये वॉर्ड अधिकारी, शिक्षण अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे प्रतिनिधी, महिला व बालकल्याण अधिकारी, समुपदेशक, पत्रकार प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक पोलिस निरीक्षकांचा समावेश असेल. विविध घटकांना एकत्र आणून समाजपातळीवर ड्रग्जविरोधी जनचळवळ उभारण्याचा उद्देश असल्याचे लोढा यांनी नमूद केले.

Web Title: Mangal prabhat lodha responsibility entrusted to drugs free mumbai high level committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Drugs Case
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
1

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी
2

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार
4

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.