Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच भक्तिसंगीत, संतपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 21, 2026 | 01:17 PM
'कानडा राजा पंढरीचा'तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

'कानडा राजा पंढरीचा'तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

Follow Us
Follow Us:

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘कानडा राजा पंढरीचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता रंगशारदा, वांद्रे (पश्चिम), मुंबई येथे हा कार्यक्रम सादर होणार आहे. कानडा राजा पंढरीचा’ हा महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या सांस्कृतिक वारशाचा सुरेल आविष्कार आहे. विठ्ठलभक्ती, संतपरंपरा आणि अभंगसंगीत यांच्या माध्यमातून रसिकांना भक्तिरसपूर्ण सांगीतिक अनुभव देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलनामाच्या भक्तीभावात रसिकांना चिंब करणारा हा विशेष सांगीतिक सोहळा ठरणार आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची मोठी भेट! दादर-पंढरपूर दरम्यान सुटणार २ विशेष गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक

भक्तिपरंपरेसह सांस्कृतिक वारशाचा नवपिढीला परिचय

या समृद्ध भक्तीपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने ‘कानडा राजा पंढरीचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.

भक्तिसंगीत, संतपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच भक्तिसंगीत, संतपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, मुंबई व परिसरातील विठ्ठलभक्त, वारकरी, संगीतप्रेमी, कला रसिक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिरसपूर्ण सांगीतिक अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

Ashadhi Wari 2026: पंढरपूरची चंद्रभागा इतकी पवित्र का मानली जाते? जाणून घ्या वारकरी परंपरेतील विशेष स्थान

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या सुमधुर आवाजातून भक्तिगीते, अभंग आणि विठ्ठलभक्तीपर रचनांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. संगीत संयोजन निरंजन लेले यांचे असून, कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. सचिन सावंत, अथर्व आठल्ये, संतोष दिवेकर, अमित गोठीवरेकर आणि संदीप कुलकर्णी हे वादक कलाकार कार्यक्रमात साथसंगत करणार आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात आषाढी एकादशी, तसेच पंढरपूरची वारी यांना अनन्यसाधारण महत्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संतपरंपरेतील संतांच्या अभंगवाणीने महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेला समृद्ध केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: A celebration of devotion through kanada raja pandharicha a special musical program organized in mumbai to mark ashadhi ekadashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘सन मराठी’चा अनोखा पुढाकार, ‘इच्छा कलश’मधून विठुरायाच्या चरणी पोहोचणार भक्तांच्या मनोकामना
1

‘सन मराठी’चा अनोखा पुढाकार, ‘इच्छा कलश’मधून विठुरायाच्या चरणी पोहोचणार भक्तांच्या मनोकामना

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा
2

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी
3

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

Mumbai News: आरे स्टॉलधारकांना दिलासा! पुनर्वसनासह स्वतंत्र धोरणासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक
4

Mumbai News: आरे स्टॉलधारकांना दिलासा! पुनर्वसनासह स्वतंत्र धोरणासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.