Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde: “… या पुनर्विकासाला गती देण्यात येईल”; एकनाथ शिंदेंचे विधानसभेत आश्वासन

बृहन्मुंबई महानगरपालिकेने किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने इमारत धोकादायक घोषित केली, तर प्रथम इमारत मालकाला पुनर्विकासाची संधी दिली जाते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2025 | 10:45 PM
Eknath Shinde: “… या पुनर्विकासाला गती देण्यात येईल”; एकनाथ शिंदेंचे विधानसभेत आश्वासन
Follow Us
Follow Us:

 मुंबई: मुंबई शहरातील धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करून या पुनर्विकासाला गती देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधानसभेत दिले. विधानसभेत सदस्य सर्वश्री अमिन पटेल, पराग आळवणी, अजय चौधरी, योगेश सागर, सुनिल राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, अतुल भातखळकर, छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री  बोलत होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बृहन्मुंबई महानगरपालिकेने किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने इमारत धोकादायक घोषित केली, तर प्रथम इमारत मालकाला पुनर्विकासाची संधी दिली जाते. मालकाने ६ महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर न केल्यास, भोगवटादारांच्या किंवा भाडेकरूंच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला ही संधी दिली जाते. जर त्यांनीही ६ महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर केला नाही, तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत भूसंपादन करून पुनर्विकास करण्याची तरतूद केली आहे.

या प्रक्रियेनुसार, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने ८५४ इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यापैकी ६७ मालकांनी पुनर्विकास प्रस्ताव सादर केले,त्यापैकी ३० मालकांना ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आले आहे.

राज्य शासन नवीन गृहनिर्माण धोरण आणत असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होतील याची सुनिश्चित केली जाणार आहे. रखडलेल्या पुनर्विकासामुळे मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना  परत मुंबईत आणणार तसेच मुंबईतील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी सरकार कटिबद्ध आहे. असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा सदस्य अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Eknath Shinde : “अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”, एकनाथ शिंदे यांची मागणी

दोन्ही सभागृहात निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यासारखी माणसं शरीराने भारतात राहतात. त्यांना देशाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी कसलेही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. अशांची भलामण करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आपला इतिहास शौर्याचा आहे. पराक्रमाचा आहे. नऊ वर्षात 696 लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते. ते उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Meeting rapid redevelopment of buildings will accelerated by removing obstacles redevelopment said eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • Building Construction
  • Eknath Shinde
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Koyna Dam Affected Rehabilitation: कोयना धरणाच्या शिल्लक जमिनी प्रकल्पग्रस्तांना परत करा; अखिल कोयना पुनर्वसन संघाची मागणी
1

Koyna Dam Affected Rehabilitation: कोयना धरणाच्या शिल्लक जमिनी प्रकल्पग्रस्तांना परत करा; अखिल कोयना पुनर्वसन संघाची मागणी

वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात
2

वाराणसी विमानतळ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; शिंदे गटाच्या नेत्याला सुरक्षा यंत्रणांनी घेतलं ताब्यात

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे ‘एआय’ अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
3

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचे ‘एआय’ अस्त्र! एअरवाईज प्रणालीद्वारे ७५ ठिकाणी हायपरलोकल सेन्सर्स; प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट
4

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यात ऊन-पावसाचा खेळ; ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.