Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार! ‘चैत्यभूमी’ नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात पूर्ण करू – मुख्यमंत्री फडणवीस

Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याची प्रक्रिया विधिमंडळाच्या अधिवेशनात पूर्ण करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महापरिनिर्वाण दिनासाठी 15 लाख अनुयायांच्या सुविधांचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 18, 2026 | 06:51 PM
Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार! ‘चैत्यभूमी’ नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात पूर्ण करू – मुख्यमंत्री फडणवीस

Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार! ‘चैत्यभूमी’ नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात पूर्ण करू – मुख्यमंत्री फडणवीस

Follow Us
Follow Us:
  • महापरिनिर्वाण दिनी 15 लाख अनुयायी येण्याची शक्यता
  • सुविधा, सुरक्षा आणि वाहतुकीचे विशेष नियोजन करण्याचे निर्देश
  • इंदू मिल स्मारकासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही
 

Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ असे नाव देण्याच्या मागणीला आता गती मिळणार आहे. राज्य सरकारने या नामकरणाला यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, केंद्र सरकारकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर स्थानकाच्या नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी सुविधा, सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता आणि वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी परिसरातील तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे आणि मुंबई महापालिकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दादर स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. राज्य सरकारने या मागणीला तत्त्वतः मान्यता देऊन केंद्र सरकारला पत्रही पाठवले आहे. मात्र, नामकरणाच्या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीशी संबंधित काही बाबींचे मार्गदर्शन केंद्र सरकारकडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर स्थानकाचे नामकरण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Wadia Maternity Hospital: केट मिडलटन यांची मुंबईतील वाडिया प्रसूतिगृहाला भेट; डॉक्टर, नवमाता आणि कुटुंबीयांशी साधला संवाद

15 लाख अनुयायांच्या गर्दीचे नियोजन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यासह देशाच्या विविध भागांतून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येतात. यंदा 5 आणि 6 डिसेंबरला चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क परिसरात सुमारे 15 लाख अनुयायी येण्याची शक्यता असल्याचे समन्वय समिती आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत सांगितले. त्यामुळे उपलब्ध सुविधांमध्ये वाढ करावी आणि मागील वर्षांच्या अनुभवातून समोर आलेल्या त्रुटी दूर कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

अनुयायांना निवास, विश्रांती आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठे मंडप आणि जर्मन हँगर उभारण्यात येतात. यामध्ये अधिकाधिक अनुयायांना थांबता यावे, यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, भोजन आणि पोलीस बंदोबस्त यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये, असे निर्देश देण्यात आले.

राज्यातील वातावरणात होतोय बदल; विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता

वाहतूक आणि सुरक्षेसाठी विशेष खबरदारी

चैत्यभूमी परिसरातील गर्दी लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेचे स्वतंत्र नियोजन करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ऑटोरिक्षांच्या प्रवेशावर मर्यादा, अनुयायांच्या पुढील प्रवासाची सुविधा आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वनियोजित व्यवस्था असावी. रेल्वे, रस्ते वाहतूक, स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलीस यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना त्रास होऊ नये आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलनांवर अधिकृत बंदी घालण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. परिसरात शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरण राखण्याची जबाबदारी पोलीस व प्रशासनाने पार पाडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

इंदू मिल स्मारकासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याच्या कामासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी शासन त्याची भरपाई करण्यास तयार आहे. स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अनुयायांच्या सुविधांना प्राधान्य – एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नसल्याची ग्वाही दिली. मुंबई महापालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरविकास विभागाने समन्वयाने काम करावे. समन्वय समिती आणि विविध संघटनांकडून येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोल सवलत देण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे शिंदे यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अनुयायांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. चैत्यभूमी परिसरासह मुंबईत येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे त्यांनी सांगितले.

महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य आणि पावित्र्य कायम राखण्यासाठी उत्सवी कार्यक्रम टाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील चित्रपट किंवा त्यांच्या विचारांशी सुसंगत उपक्रम आयोजित करण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सर्व विभागांच्या समन्वयातून यंदाचा महापरिनिर्वाण दिन सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दादर रेल्वे स्थानकाचे नाव काय ठेवण्यात येणार आहे?

    Ans: दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ असे नाव देण्याचा प्रस्ताव आहे.

  • Que: दादर स्थानकाच्या नामकरणाची प्रक्रिया कधी पूर्ण होणार?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माहितीनुसार, विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

  • Que: इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?

    Ans: स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही आणि काम वेगाने पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Dadar railway station renaming chaityabhoomi devendra fadnavis rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • Chief Minister Devendra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दैवत…”
1

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दैवत…”

Shivsena Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद
2

Shivsena Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद

Eknath Shinde : अमित शाहांवरील टीकेनंतर एकनाथ शिंदे संतापले, ‘खरा मोठा थापाडा कोण?’ म्हणत उद्धव ठाकरेंना सुनावलं!
3

Eknath Shinde : अमित शाहांवरील टीकेनंतर एकनाथ शिंदे संतापले, ‘खरा मोठा थापाडा कोण?’ म्हणत उद्धव ठाकरेंना सुनावलं!

शेतकऱ्यांसाठी DCM सुनेत्रा पवार आल्या धावून; राष्ट्रवादीच्या पक्षातील आमदारांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय
4

शेतकऱ्यांसाठी DCM सुनेत्रा पवार आल्या धावून; राष्ट्रवादीच्या पक्षातील आमदारांनी घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.