MGL ग्राहक सावधान! एक क्लिक आणि निवृत्त अधिकाऱ्याला 4 लाखांचा फटका... अशी घ्या खबरदारी
नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ६३ वर्षीय निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्याला फसवणूक करणाऱ्यांनी लक्ष्य केले. फसवणूक करणाऱ्यांनी त्यांना फोन करून, बिल त्वरित न भरल्यास गॅस कनेक्शन तोडण्याची धमकी दिली. सध्या, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक गॅस संकटाच्या बातम्या चर्चेत आहेत. गुन्हेगारांनी याच भीतीचा गैरफायदा घेतला. पीडित व्यक्तीला वाटले की एकदा कनेक्शन तुटले की, संकटाच्या काळात पुन्हा गॅस मिळणे अशक्य होईल. (फोटो सौजन्य – Pinterest)
गॅसपुरवठा खंडित होण्याच्या ग्राहकांच्या भितीचा गैरफायदा घेऊन, फसवणूक करणाऱ्याऱ्यांनी पीडित व्यक्तीला एक एपीके (अँड्रॉइड अॅप्लिकेशन पॅकेज) फाईल पाठवली आणि ‘पेमेंट अपडेट’साठी ती डाउनलोड करण्यास सांगितले. पीडित व्यक्तीने अॅप इन्स्टॉल करताच, त्याचा फोन हॅक झाला आणि फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्या बँक खात्यातून ४ लाख रुपये काढून घेतले. अलीकडेच मुंबईत अशा प्रकारची चाळीसहून अधिक प्रकरण नोंदवली गेली आहेत.
Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, मेट्रो 9 आणि 2B कधी सुरु होणार? जाणून घ्या तारीख






