Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका

महाराष्ट्रात सरासरी दररोज १.८० कोटी २ लिटर दूध संकलित होते. मे २०२६ मधील ताज्या आकडेवारीनुसार, दुग्ध आयुक्त कार्यालयाकडे १ कोटी ७९ लाख २२ हजार लिटर दूध संकलनाची नोंद आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2026 | 09:38 AM
मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका

मुंढेंचा दणका ! दूध संकलनात तब्बल 20 लाख लिटरची घट; भेसळीविरोधातील कारवाईचा फटका

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात सध्या दररोज सुमारे पावणेदोन कोटी लिटर दूध संकलित केले जाते. गतवर्षीच्या तुलनेत यात जवळपास २० लाख लिटरची घट झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळीविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे ही घट झाल्याचा दावा उत्पादकांकडून केला जात आहे. गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ झाली असून, ते प्रतिलिटर ४० रुपयांपुढे गेले आहेत.

राज्यात दूध संकलन करणाऱ्या गुजरातमधील अमूलच्या संलग्न जिल्हा दूध संघांनी हे दर जाहीर केले आहेत. राज्यात गुजरातमधील सहकारी दूध संघांनी प्रमाणित गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर ४१ रुपये दर जाहीर केला आहे. यापूर्वी हा दर प्रतिलिटर ४० रुपये होता. मात्र, राज्यातील स्थानिक खासगी संस्था अद्याप गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३८ ते ३९ रुपये दर देत आहेत. म्हशीच्या दुधाच्या संकलनातही मोठी घट झाली आहे. गुजरातमधील सहकारी संस्थांनी गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ केली असली, तरी राज्यातील स्थानिक खासगी संस्था अद्याप कमी दराने दूध खरेदी करत आहेत.

राज्यातील दैनंदिन संकलन १.८० कोटी लिटर

महाराष्ट्रात सरासरी दररोज १.८० कोटी २ लिटर दूध संकलित होते. मे २०२६ मधील ताज्या आकडेवारीनुसार, दुग्ध आयुक्त कार्यालयाकडे १ कोटी ७९ लाख २२ हजार लिटर दूध संकलनाची नोंद आहे.

सोलापूरात एफडीएची धडाकेबाज कारवाई

दूध भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेचा फटका आता थेट सोलापूर जिल्ह्यालाही बसला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचर येथे राज्यातील गाजलेल्या दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर अवघ्या आठवडाभरातच मुंढे यांनी माळशिरस तालुक्यातील अकलूजपर्यंत पोहोचलेल्या या साखळीवर दुसरा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत आणखी एक मोठे रॅकेट उध्वस्त केले आहे.

1.35 कोटींचा साठा जप्त

अकलूज येथील गोदामावर टाकलेल्या छाप्यात तब्बल ९६ हजार ७८० किलो संशयित पावडर जप्त करण्यात आली. या साठ्याची किंमत १ कोटी ३५ लाख ४६ हजार ८१ रुपये इतकी आहे. याशिवाय सोनू घोरपडे यांच्या गोदामातून ५१ किलो मिल्क पावडर जप्त करण्यात आली असून तिची किंमत ७ हजार १७१ रुपये आहे.

दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड

Web Title: Milk collection declines by 20 lakh liters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • Adulterating Milk
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध
1

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन
2

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन

दुष्काळामुळे तुकाराम मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच; कराड नगरपरिषदेचा काटकसरीचा निर्णय
3

दुष्काळामुळे तुकाराम मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच; कराड नगरपरिषदेचा काटकसरीचा निर्णय

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा
4

Nana Patekar Prayer Meet: नानांना अखेरचा निरोप; तुकाराम मुंढेंसह मराठी कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली, बॉलिवूडच्या गैरहजेरीची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.