Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought: २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांसाठी मोठा ॲक्शन प्लॅन, भरत गोगावले म्हणाले…

Maharashtra Drought: गावातच मिळणार रोजगार; विकासकामांना गती दुष्काळात ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे हाती घेतली जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2026 | 07:07 PM
दुष्काळजन्य परिस्थितीवर सरकारचे नियोजन सुरू

दुष्काळजन्य परिस्थितीवर सरकारचे नियोजन सुरू

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळजन्य परिस्थितीवर सरकारचे नियोजन सुरू
  • ८ दिवसांत जिल्हानिहाय बैठका घेणार – भरत गोगावले
  • राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर
मुंबई: राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन सुरू केले आहे. “पावसाचे प्रमाण कमी झाल्याने राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार पूर्ण ताकदीने उभे राहील,” असा विश्वास रोहयो व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. पुढील आठ दिवसांत जिल्हानिहाय बैठका घेऊन उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

केंद्र आणि राज्याचा संयुक्त पुढाकार
६०:४० प्रमाणात निधी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ६०:४० या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी केंद्राकडून ४ हजार ४०० कोटी रुपये, तर राज्याकडून ३ हजार ३०० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजना आणि विविध विकासकामांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्यावर सरकारचा भर असणार आहे.

कोकणात पाऊस, पण विदर्भ-मराठवाड्यात चिंता राज्यातील पावसाच्या स्थितीवर बोलताना ते म्हणाले, “कोकणात काही प्रमाणात पाऊस झाला असला, तरी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाणी आणि शेतीबाबत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या जिल्ह्यांमधील परिस्थिती खरोखरच गंभीर असून त्यावर कशी मात करता येईल, याचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे.”

Amravati News: दुष्काळी परिस्थितीत प्रशासन सज्ज! जिल्हाधिकाऱ्यांचे दुष्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

गावातच मिळणार रोजगार; विकासकामांना गती दुष्काळात ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे हाती घेतली जाणार आहेत.

तलावांमधील गाळ काढणे आणि विहिरींची दुरुस्ती करणे.
शाळांच्या इमारती, स्मशानभूमी आणि इतर आवश्यक नागरी कामे पूर्ण करणे.
गावांचा सर्वांगीण विकास साधत रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
ज्या भागात मजूर उपलब्ध होणार नाहीत, तिथे कामांचा वेग वाढवण्यासाठी मशिनरीचा वापर केला जाईल.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत चर्चा या संपूर्ण परिस्थितीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली असून सरकार सर्व ताकदीनिशी शेतकऱ्यांना मदत करणार आहे. लवकरच केंद्रीय कृषिमंत्री देखील महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, त्यांच्यासोबत विशेष बैठक घेऊन केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळवण्यासाठी चर्चा केली जाईल, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

पुढील आठ दिवसांत सर्व घटकांना आणि लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन जिल्हानिहाय आढावा बैठका घेतल्या जातील आणि दुष्काळाच्या अडचणी लवकरात लवकर दूर केल्या जातील, असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर

Web Title: Minister bharat gogawale 265 taluka maharashtra drought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • drought news
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
1

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
2

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Amravati News: दुष्काळी परिस्थितीत प्रशासन सज्ज! जिल्हाधिकाऱ्यांचे दुष्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश
3

Amravati News: दुष्काळी परिस्थितीत प्रशासन सज्ज! जिल्हाधिकाऱ्यांचे दुष्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
4

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.