Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Prabhat Lodha: “पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून…”; मंत्री लोढांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

मंत्री मंगलप्रभात  लोढा यांच्या प्रयत्नाने महापालिका शाळांमध्ये आयटीआयच्या निवडक ट्रेड्सचे अभ्यासक्रम सुरु असल्याची माहितीही यावेळी शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2025 | 05:39 PM
Mangal Prabhat Lodha: “पालक आणि शिक्षकांच्या चर्चेतून…”; मंत्री लोढांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: मुंबई महापालिकांच्या शाळेत लवकरात लवकर पालक संघ (पेरेंट्स असोसिएशन) स्थापन करून शिक्षक आणि पालकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न मार्गी लावावेत अशा सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. वाळकेश्वर येथील कवळे मठ महापालिका शाळेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शैक्षणिक साहित्य आणि गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी, शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी एक सोहळा होऊन अविस्मरणीय ठरावा, या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित पालकांशीही संवाद साधला. तसेच त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. पालक संघाची महिन्यातून एकदा शिक्षकांसोबत बैठक आयोजित करावी त्यातून अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महा विभूतींनी महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला त्यांचे कार्य आणि कर्तृत्व पुढच्या पिढीला कळावे यासाठीही महिन्यातून एकदा शाळांमध्ये विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या.

मंत्री मंगलप्रभात  लोढा यांच्या प्रयत्नाने महापालिका शाळांमध्ये आयटीआयच्या निवडक ट्रेड्सचे अभ्यासक्रम सुरु असल्याची माहितीही यावेळी शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली. यापुढे विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास मंत्री प्रयत्नशील राहतील, असा दृढ विश्वासही कंकाळ यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला सहायक उपायुक्त मनीष वळंजू, कवळे मठ महापालिका शाळेच्या प्रशासकीय प्रमुख श्रोमती सायली पाटील यांच्यासह पालिकेच्या डी विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Mangal Prabhat Lodha: “राष्ट्रहिताच्या विचारांनी ITI मध्ये…”; मंत्री मंगलप्रभात लोढांची संकल्पना

मंत्री मंगलप्रभात लोढांची संकल्पना

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निम्मिताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

येत्या सहा जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओ संदेशाद्वारे या व्याख्यानमालेचे उदघाटन होणार आहे. त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून आयटीआय मध्ये अत्याधुनिक सहा विषयांचे नवे अभ्यासक्रमही सुरु करणार असल्याची माहितीही लोढा यांनी यावेळी दिली.

 

Web Title: Minister mangal prabhat lodha gave instructions to officers about solve educational issue maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • Education Department
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी
1

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…
2

Mumbai News : पश्चिम मुंबईसाठी २००० मीटर लांबीचा विशेष आराखडा, कसा असेल प्रकल्प? जाणून घ्या…

Solapur News : शिक्षणाबरोबरच सृजनात्मक कला अवगत करावी; ‘सृजनरंग’ महोत्सव पारितोषिक समारंभ उत्साहात
3

Solapur News : शिक्षणाबरोबरच सृजनात्मक कला अवगत करावी; ‘सृजनरंग’ महोत्सव पारितोषिक समारंभ उत्साहात

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी
4

भांडुपमध्ये भीषण अपघात; भरधाव ‘बेस्ट’ने अनेकांना चिरडले, चौघांचा मृत्यू तर 9 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.