Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Traffic Jam: सलग सुट्ट्यांचा फटका! मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या

मुंबई–पुणे महामार्गावर झालेल्या तीव्र वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्यांसह खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला. तासन्‌तास वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 01, 2026 | 11:23 AM
मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या

मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या

Follow Us
Close
Follow Us:
  • सलग सुट्ट्यांचा फटका!
  • मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
  • खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या
Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने नागरिक घराबाहेर पडले आहेत. दोन तासांपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोडीं निर्माण झाली. याचा फटका लोकांना बसत आहे. मुंबई ते पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लेनमध्ये समस्या निर्माण झाली आहे. सलग तीन वेळा वाहतूक थांबल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने लोणावळ्याच्या दिशेने निघाले आहेत. सकाळी वाहतूक हळूहळू सुरू झाली होती. मात्र, आता दोन तासांहून अधिक काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. विकेंडमुळे एक्सप्रेसवर वाहनांच्या लांबच लांब रागा बघायला मिळत आहेत. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत वाहतूक कोंडी आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांचा पुणे लेनवर पंधरा मिनिटांचा ब्लॉक आहे. मात्र, वाहतूक काही सुरळीत होत नाही.

Maharashtra Legislative Council Elections 2026 : महाविकास आघाडीतला तणाव चर्चेनंतर अखेर निवळला

खासदार सुप्रिया सुळे यांना सर्वात मोठा वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. या वाहतूक कोडींत सुप्रिया सुळे गेल्या दोन अडकून बसल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी काही व्हिडीओही तयार केली आहेत. सुप्रिया सुळे व्हिडीओमध्ये मी दोन तासांपासून वाहतूक कोडींत अडकल्याचे सांगताना दिसत आहेत. शिवाय त्या शेजारी असलेल्या वाहनचालकांनाही गप्पा मारत आहेत.

तर दुसरीकडे १ मे, महाराष्ट्र दिनी, राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. हा प्रकल्प मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास केवळ अधिक जलद आणि सुरक्षित करणार नाही, तर महाराष्ट्राच्या आधुनिक अभियांत्रिकी क्षमतेचे एक प्रमुख उदाहरण म्हणूनही ओळखला जातो. प्रकल्प पूर्ण झाल्यावर, मुंबई आणि पुणे दरम्यानच्या प्रवासाचा वेळ अंदाजे २५ ते ३० मिनिटांनी कमी होईल. सध्या, घाट विभागातील वाहतूक कोंडी, तीव्र वळणे आणि तीव्र चढावांमुळे वाहनांचा वेग मंदावतो. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प या समस्यांचे निराकरण करेल.

महाप्रकल्प महाराष्ट्राची नवी ओळख बनत आहेत

गेल्या काही वर्षांत, महाराष्ट्रात अनेक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने विकसित करण्यात आले आहेत. समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू आणि आता मुंबई-पुणे मिसिंग लिंक यांसारखे प्रकल्प राज्याला एका आधुनिक वाहतूक जाळ्याच्या दिशेने पुढे नेत आहेत. या प्रकल्पांमुळे उद्योग, व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज हजारो वाहनांची ये-जा पाहता, हा प्रकल्प आर्थिक घडामोडींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

Pratap Sarnaik : भाईंदरपाडा जमीनीचा वाद चिघळला; सरनाईक-मेहता पुन्हा आमनेसामने, विहंग ग्रुपकडून मेहतांना ‘Cease & Desist’ नोटीस

Web Title: Mp supriya sule is stuck in traffic jam on mumbai pune expressway news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Mumbai - Pune Expressway
  • supriya sule
  • traffic jam

संबंधित बातम्या

बोर घाटातील कोंडीमुळे महाराष्ट्राला दररोज 1 कोटींचा फटका; ‘Missing Link’ प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर
1

बोर घाटातील कोंडीमुळे महाराष्ट्राला दररोज 1 कोटींचा फटका; ‘Missing Link’ प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.