Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात

MPSC च्या CBT आणि Normalization प्रणालीविरोधात काँग्रेसने सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 08, 2026 | 09:03 PM
MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization पद्धत लागू करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दुपारी १२ वाजता सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसादात सुरुवात झाली.

आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला भक्कम पाठिंबा दिला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या या मागणीला सक्रिय पाठिंबा दिला आहे. अधिवेशनातही महाविकास आघाडीच्या आमदारांनी हा प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडला. याशिवाय MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून काँग्रेसचे प्रतिनिधी, विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती दोन वेळा करण्यात आली होती. मात्र, त्यास कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.

Mumbai News: प्रदूषणमुक्तीची ‘मिठी’ फक्त कागदावरच! मुंबईकरांना सांडपाण्याचा त्रास, तर महानगरपालिकेच्या तिजोरीला २१ कोटींचा भुर्दंड

२८ जून २०२६ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे स्पष्ट इशारा देण्यात आला होता की, पुढील दहा दिवसांत CBT व Normalization संदर्भातील निर्णय मागे घेतला नाही, तर काँग्रेस विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरेल. शासन आणि MPSC प्रशासनाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा दळवी, प्रदेश सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय रामकृष्ण शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग सरचिटणीस दिगंबर राऊत, राज्य सरचिटणीस आनंद सिंह, महिला काँग्रेस सरचिटणीस व नवी मुंबई शहर जिल्हा प्रभारी अध्यक्ष उज्वला साळवे, राज्य सचिव व पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष मा. श्रुती म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपोषणात सहभागी झाले आहेत.

सरकारने अखेर घोषणा केलीच ! ‘या’ वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल

MPSC ने CBT व Normalization संदर्भातील निर्णय तात्काळ मागे घ्यावा, विद्यार्थ्यांशी व त्यांच्या प्रतिनिधींशी खुली चर्चा करावी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून त्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Mpsc cbt normalization protest congress indefinite hunger strike belapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • Congress
  • MPSC Exam
  • Mumbai Congress protests
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
1

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
2

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद
3

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप
4

राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वीच ABVP-NSUI वाद चिघळला; विद्यार्थिनींना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.