
Maharashtra Politics: मुंबई महापालिकेसाठी एकत्र येताच मनसेला मोठा धक्का; 'हा' बडा शिलेदार फुटला
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची युती
निवडणुकीआधीच मनसेला मोठा धक्का
मुंबईतील मोठ्या नेत्याने सोडली साथ
MNS Raj Thackeray: राज्यात काल एका नव्या युतीचा जन्म झाल्याचे पाहायला मिळल. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी युती केली आहे. दोन्ही पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत. मात्र कल युतीची घोषणा झाली आणि आज राज ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. सुधाकर तांबोळी या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ठाकरे बंधु एकत्रित येताच राज ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे सचिव आणि विभागअध्यक्ष सुधाकर तांबोळी यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. सुधाकर तांबोळी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
सुधाकर तांबोळी हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याने राज ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सुधाकर तांबोळी यांनी प्रवेश केला आहे. तांबोळी यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणून काम पाहिले आहे. मुंबई उपनगरातील एक मोठे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र आता त्यांच्या जाण्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे.
Maharashtra Politics: ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ
ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का
मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला आणि मनसेला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात आज नव्या युतीची सुरुवात झाली आहे. मात्र युतीची घोषणा होताच छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला धक्का बसला आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक होण्याआधीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे युती झाली असली तरी पक्षात सुरू असलेली गळती कशी थांबवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे म्हटले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुमित खांबेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे समोर येत आहे. 15 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणूक होणार आहे. त्याआधी मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
राज ठाकरेंकडून घोषणा
राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या ठाकरे बंधुंच्या युतीची अखेर आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली. मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत ही घोषणा करण्यात आली.