
आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने १ मार्च २०१४ पासून सुरू करण्यात आलेल्या ‘१०८’ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा गोंदिया जिल्ह्यातील २ लाख ९५ हजार ७ रुग्णांनी लाभ घेतला आहे. मार्च २०१४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील ही आकडेवारी असून, या सेवेच्या माध्यमातून अपघातग्रस्त, गर्भवती महिला आणि इतर गंभीर रुग्णांना तातडीची मदत मिळाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि जिल्ह्यात १५ रुग्णवाहिकांद्वारे वैद्यकीय सेवा पोहोचविण्याची आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही सेवा सुरू करण्यात आली. जिल्ह्यात सध्या १५ रुग्णवाहिका कार्यरत असून, ग्रामीण, शहरी तसेच अतिदुर्गम भागांतील नागरिकांना ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाते. रस्ता अपघात, आग लागून होरपळणे, हृदयविकाराचा झटका, विषबाधा आणि प्रसूतीसंबंधी आपत्कालीन परिस्थितीत १०८ क्रमांकावर संपर्क साधता येतो. अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेल्या रुग्णवाहिकेत रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राथमिक उपचार केले जातात. त्यामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यास मदत होते. जीपीआरएस प्रणालीच्या माध्यमातून रुग्णवाहिकेचे स्थान निश्चित करून ती घटनास्थळी व्यवस्था आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात १५ अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिका सध्या के.टि.एस. सामान्य जिल्हा रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा, ग्रामीण रुग्णालय देवरी, ग्रामीण रुग्णालय आमगाव, ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव, ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध, ग्रामीण रुग्णालय गोरेगाव, ग्रामीण रुग्णालय सौंदड, ग्रामीण रुग्णालय चिचगड, ग्रामीण रुग्णालय सालेकसा, ग्रामीण रुग्णालय रजेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र एकोडी, प्राथमिक आरोग्य केंद्र डव्वा या ठिकाणी रुग्णवाहिका कार्यरत असल्याची माहीती त्यांनी दिली.
जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची कमाल! मेंदूच्या मुख्य धमनीजवळ अडकलेली गोळी सुरक्षितपणे काढली
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने जिल्ह्यात १५ रुग्णवाहिका कार्यरत असून, सकाळ आणि रात्र सत्रात वाहनचालक व वैद्यकीय अधिकारी त्यासाठी आरोग्य सेवा देत आहे. रुग्ण अथवा इतर कोणाकडून १०८ क्रमांकावर कॉल केल्यास तो क्रमांक कुठला ते शोधले जाते. त्याचवेळी ‘जीपीएस ‘च्या मदतीने त्या भागात कोणते रुग्णालय आहे हे पाहून तेथील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली जाते. त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचेल, याकडे लक्ष दिले जाते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. जनजागृती वाढवून ही सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आगामी काळात उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही डॉ. पटले यांनी सांगितले.
💡 Frequently Asked Questions
1. गोंदिया जिल्ह्यात 108 रुग्णवाहिका सेवेचा किती रुग्णांना लाभ झाला?
मार्च 2014 ते सप्टेंबर 2026 या कालावधीत 2,95,007 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला.
2. गोंदिया जिल्ह्यात सध्या किती 108 रुग्णवाहिका कार्यरत आहेत?
जिल्ह्यात सध्या 15 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. ग्रामीण, शहरी आणि अतिदुर्गम भागांतील नागरिकांना ही सेवा मोफत दिली जाते.
3. 108 रुग्णवाहिका कोणत्या आपत्कालीन परिस्थितीत बोलावता येते?
रस्ता अपघात, भाजणे, हृदयविकाराचा झटका, विषबाधा आणि प्रसूतीसंबंधी आपत्कालीन परिस्थितीत 108 क्रमांकावर संपर्क साधता येतो.