Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

kurla bus accident: कुर्ला बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट, चालकाने पहिल्यांदाच बस चालवली अन्…, आतापर्यंत 7 मृत्यू तर 49 जखमी

Kurla Best Bus Accident: कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर येत असून बस चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली. संजय मोरे याने काल पहिल्यांदा बेस्ट चालक म्हणून काम केल्याची माहिती मिळच आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 10, 2024 | 11:33 AM
कुर्ला बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट, चालकाने पहिल्यांदाच बस चालवली अन्..., आतापर्यंत ६ मृत्यू तर ४९ जखमी (फोटो सौजन्य-X)

कुर्ला बस अपघात प्रकरणात मोठी अपडेट, चालकाने पहिल्यांदाच बस चालवली अन्..., आतापर्यंत ६ मृत्यू तर ४९ जखमी (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Follow Us:

Kurla Best Bus Accident News In Marathi : सोमवारी रात्री मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या भीषण बस अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला, तर 49 पेक्षा जास्त जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. या जखमी प्रवाशांवर उपचार सुरू असून त्यांना सायन आणि कुर्ला भाभा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे हा अपघात झाला. ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीला जात होती. ही बेस्ट बसे बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या अंतर्गत येते. याचदरम्यान आता बेस्ट चालक संजय मोरे याच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुर्ला परिसरातील गजबलेल्या लालबहादुर शास्त्री मार्गावर लोकांच्या गर्दीत भरधाव बस शिरुन हा अपघात झाला होता. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला, असे कारण प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, काहीजण या बसचा चालक संजय मोरे याच्याबद्दलही संशय व्यक्त करत आहेत. संजय मोरे याने मद्यपान केले होते का, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. तर कुर्ला बस अपघातात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक संजय मोरे याने मद्यप्राशन केलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच बसमध्ये तांत्रिक बिघाड ही नव्हता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

मुंबईच्या कुर्ला परिसरात बेस्ट बसचा थरार; अनेक वाहनांना धडक, तिघांचा मृत्यू 17 जण जखमी

संजय मोरेने काल पहिल्यांदा बेस्ट चालक म्हणून काम केले…

संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या असल्फा परिसरात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. तर संजय मोरे कंत्राटी चालक म्हणून 1 डिसेंबरला बेस्टमध्ये रुजू झाला. मात्र संजय मोरेने काल (9 डिसेंबर) पहिल्यांदा बेस्ट चालक म्हणून काम केले. संजयने ब्रेकऐवजी एक्सलेटर दाबल्याचे समजते. त्यामुळेच हा अपघात झाला. बसवरील नियंत्रण सुटले अन् कुर्लातील हा भीषण अपघात झाल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. संजय मोरे याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत- मुख्यमंत्री

“या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना… — @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 10, 2024

मृतांचा आकडा पोहोचला ७ वर

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला आहे. या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, काही जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.

असुरक्षित लैगिंक संबंधामुळे HIV संसर्गाचा धोका वाढला, मुंबईची आकडेवारी धडकी भरवणारी

Web Title: Mumbai accident death toll rises to six 49 injured in kurla best bus crash in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 11:33 AM

Topics:  

  • Mumbai
  • sanjay more

संबंधित बातम्या

Mumbai Lake Level: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! सात तलावांमधील पाणीसाठा ४८ टक्क्यांच्या पार; ‘तुळशी’, ‘विहार’ तलाव ओव्हरफ्लो…
1

Mumbai Lake Level: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! सात तलावांमधील पाणीसाठा ४८ टक्क्यांच्या पार; ‘तुळशी’, ‘विहार’ तलाव ओव्हरफ्लो…

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान
2

Bhandup BEST Bus Accident : भांडुपमध्ये बेस्ट ई-बसचा भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अनेक वाहनांचे नुकसान

Mumbai Crime: मुंबईतील राज्यपालांच्या लोकभवनात SRPF जवानाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या
3

Mumbai Crime: मुंबईतील राज्यपालांच्या लोकभवनात SRPF जवानाची सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या

Neelam Gorhe on Mumbai Rain: मुंबईत पावसामुळे १२ जणांचा मृत्यू; नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले दुःख, म्हणाल्या…
4

Neelam Gorhe on Mumbai Rain: मुंबईत पावसामुळे १२ जणांचा मृत्यू; नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले दुःख, म्हणाल्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.