असुरक्षीत लैगिंक संबंधामुळे HIV संसर्गाचा धोका वाढला, मुंबईची आकडेवारी धडकी भरवणारी (फोटो सौजन्य-X)
नवीन शहरात नवीन मित्र – मैत्रीन करायचे असतील ऑनलाइन डेटिंग ॲप किंवा वेबसाइटचा वापर जास्त करतात. . मात्र एवढ्या मोठ्या शहरात आल्यानंतर अनेकदा अति उत्साहात अशा चुका करतात की, ज्यांचा नंतर पश्चाताप होतो. कारण मैत्री करण्याच्या नादात एकट्या मुंबईतील 163 जणांना HIV ची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ऑनलाइन डेटिंग ॲप्सचे जग अतिशय खोल आहे.डेटिंग ॲप डाऊनलोड केल्यावर आधी मैत्री होऊन जाते, मग रात्रंदिवस चॅटिंग,फेस टाईम यामध्ये मैत्री संपून कधी एखादे नाते सुरू होते हे तरूण-तरूणींना कळतच नाही. नातं सुरू केल्यानंतर अर्थातच शारीरिक गरजा पूर्ण होईपर्यंत मैत्री सुरू राहते. या ऑनलाइन फ्रेंडशिप नेटवर्कमध्ये राज्यातील 463 लोक आहेत. त्यापैकी 119 लोक मुंबईतील आहेत. राज्यात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हे आहेत.
ऑनलाइन डेटिंग ॲप युजर्स एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्म युजर्समध्ये चाचणीत भाग घेतलेल्यांपैकी 5.19% एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यामध्ये 770 लोकांनी सहभाग घेतला होता. या बाधित लोकांना एचआयव्हीची लागण झाल्याचे माहीत नव्हते. अशा परिस्थितीत ते नकळत इतर लोकांना देखील संक्रमित करू शकतात. मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी (एमडीएसीएस), एचआयव्ही केअर गिव्हर या मोहिमेद्वारे, अर्धा डझन डेटिंग ॲप्सद्वारे लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांना चाचणी घेण्यास पटवून दिले.
एमडीएएक्स, एनजीओ पाथ आणि समलिंगी समुदायासाठी काम करणारी एनजीओ हमसफर ट्रस्ट यांच्या मदतीने पायलट प्रोजेक्टच्या धर्तीवर एचआयव्ही केअर गिव्हरची सुरुवात करण्यात आली. यामध्ये केवळ एमडीएएक्स आणि एनजीओ कर्मचाऱ्यांची एचआयव्ही केअर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डेटिंग ॲपवर लोकांशी संपर्क साधण्याचा त्याचा उद्देश होता.
MDAX कडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत 26,673 लोकांना ऑनलाइन फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या. त्यापैकी 1,450 लोकांनी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली.मैत्री करण्याच्या नादात एका व्यक्तीकडून बरेच समुपदेशन केल्यानंतर, लोक एचआयव्ही आणि लैंगिक आजारांसाठी चाचणी घेण्यास तयार झाले. परंतु त्यापैकी केवळ 770 लोक चाचणीसाठी आले. त्यापैकी 40 जणांमध्ये एचआयव्ही संसर्गाची पुष्टी झाली आहे. मुंबईचे हे आकडे आश्चर्यचकित करणारे आहेत. जे लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे समुपदेशन सुरू आहे.
असुरक्षित लैंगिक संबंधामुळे एचआयव्ही संसर्गाचा धोकाही वाढतो. यात तरूण वर्ग जास्त अडकला आहे. यासाठी जनजागृती करणे अतिशय महत्त्वाचे आहे.या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मते ऑनलाईन डेटिंग साइट्सनी याविषयी जागरुकता पसरवणे गरजेचे आहे. यातून उद्भवू शकणाऱ्या धोक्यांविषयी लोकांना माहिती देणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन पार्टनरसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी दोघांनीही एचआयव्हीची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.