संग्रहित फोटो
पुणे मंडळाच्या १५ टक्के एकात्मिक आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत या घरांची सोडत जाहीर करण्यात आली होती. २४ ऑगस्टपासून अर्जप्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीपासूनच अर्जदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. त्यातच १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान महाआयटी प्रणाली बंद पडल्याने कागदपत्र पडताळणीचे काम ठप्प झाले. परिणामी, अर्जदारांचा वेळ वाया गेला आणि मंडळाला तिसऱ्यांदा मुदतवाढ द्यावी लागली. नियोजनातील त्रुटींचा फटका मात्र घरासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागला.
३० ऑक्टोबंरपर्यंत एकूण ३ लाख १ हजार ५८६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी २ लाख ४५ हजार २३२ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. म्हणजेच ४ हजार ४६२ घरांसाठी लाखो नागरिकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. कागदपत्र पडताळणी आणि अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदारांची संख्या अडीच लाखांहून अधिक होण्याची शक्यता आहे.
तीन वर्षांत यंदा म्हाडाच्या घरांसाठी विक्रमी नोंदणी!
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या घरांच्या सोडतीला गेल्या तीन वर्षांत सातत्याने वाढता प्रतिसाद मिळत आहे. २०२४ मध्ये ३ हजार ६६२ घरांसाठी ७१ हजार ६४२ हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. २०२५ मध्ये ४ हजार १८६ घरांसाठी २ लाख १५ हजार ८४७ अर्ज दाखल झाले. तर २०२६ मध्ये ४ हजार ४६२ घरांसाठी तब्बल ३ लाख १ हजार ५८६ नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी २ लाख ४५ हजार २३२ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज निश्चित केले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक नोंदणी झाली असून, म्हाडाच्या घरांसाठी नागरिकांचा वाढता कल अधोरेखित झाला आहे.
Ans: म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीत एकूण ४ हजार ४६२ घरांचा समावेश आहे.
Ans: ३० ऑक्टोबरपर्यंत एकूण ३ लाख १ हजार ५८६ अर्ज दाखल झाले असून, त्यापैकी २ लाख ४५ हजार २३२ अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत.
Ans: अर्जप्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्या होत्या. विशेषतः १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान महाआयटी प्रणाली बंद पडल्याने कागदपत्र पडताळणीचे काम ठप्प झाले. त्यामुळे तीन वेळा मुदतवाढ द्यावी लागली.






