Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई महापालिका मुख्यालय आता ‘AI’च्या निगराणीखाली; जुन्या इमारतीत बसणार ८७ अत्याधुनिक CCTV

Mumbai Municipal Corporation Headquarter : मुंबई महापालिका मुख्यालयाची सुरक्षा आता अधिक अत्याधुनिक होणार आहे. ऐतिहासिक जुन्या इमारतीवर AI तंत्रज्ञानाच्या मदतीने कडक नजर ठेवली जाणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 19, 2026 | 02:06 PM
मुंबई महापालिका मुख्यालय आता ‘AI’च्या निगराणीखाली; जुन्या इमारतीत बसणार ८७ अत्याधुनिक CCTV

मुंबई महापालिका मुख्यालय आता ‘AI’च्या निगराणीखाली; जुन्या इमारतीत बसणार ८७ अत्याधुनिक CCTV

Follow Us
Follow Us:
  • ८७ अत्याधुनिक AI CCTV कॅमेरे बसणार
  • संशयित हालचालींचे रिअल-टाइम विश्लेषण होणार
  • संपूर्ण प्रकल्पासाठी ३.४४ कोटींचा खर्च अपेक्षित
मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक जुन्या मुख्यालय इमारतीची सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जुन्या इमारतीमधील सुरक्षा यंत्रणेचे संपूर्ण अद्ययावतीकरण केले जाणार आहे. यावेळी इमारतीचा कानाकोपरा आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ८७अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ३ कोटी ४४ लाख ९१ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासंबंधीचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे. मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये दररोज हजारो नागरिक, अभ्यागत आणि विविध खात्यांचे अधिकारी-कर्मचारी येत असतात.

Mumbai News: पाण्यातून स्वस्त ‘हरित हायड्रोजन’ उत्प्रेरक! कोबाल्ट-निकेल-फॉस्फेटच्या मिश्रणातून किफायतशीर कॅटॅलिस्ट

मुख्यालयातील वाढता वावर लक्षात घेता सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून महापालिकेच्या प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने जुन्या इमारतीचे सविस्तर सर्वेक्षण केले होते. या पाहणीत इमारतीमधील ४८ अत्यंत संवेदनशील आणि मोक्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या. नव्या सुरक्षा रचनेनुसार इमारतीत ४१ ए-आय डोम कॅमेरे, ४४ ए-आय बुलेट कॅमेरे आणि दोन पीटीझेड कॅमेरे असे एकूण ८७ कॅमेरे बसवले जाणार आहेत.

हालचालींचे होणार रिअल-टाईम विश्लेषण

मुख्यालयाचे सर्व प्रवेशद्वार, वाहनतळ, रोख विभाग, बैंक परिसर, सेल्फी पॉईंट, सभागृह, आयुक्त कार्यालय, महापौर व उपमहापौर कार्यालय रस्ता, स्थायी समिती दालन, विरोधी पक्षनेते कार्यालय तसेब जुनी व नवीन इमारतीला जोडणारा कॉरिडोअर या कॅमे-यांच्या कक्षेत येणार आहे. या अत्याधुनिक ‘एआय’ सीसीटीव्ही प्रणालीमुळे परिसरातील हालचालींचे रिअल-टाईम विश्लेषण करणे, संशयित व्यक्ती किंवा वस्तूंची तत्काळ ओळख पटवणे आणि संभाव्य धोक्याची स्वयंचलित सूचना सुरक्षा पथकाला मिळणे शक्य होणार आहे. यामुळे संशयित हालचालीवर तात्काळ कारवाई करणे सुलभहोणार आहे.

लोकलच्या छतावर चढताच तरुणाला बसला विजेचा जबरदस्त झटका, १९ मिनिटे खोळंबली ट्रेन; घाटकोपर रेल्वे स्थानकाचा Video समोर

ई-निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांचा सहभाग

या कामासाठी पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाकडून मागवण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेत तीन कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये ‘मेसर्स सहोरा कॉर्पोरेशन’ यांची निविदा पालिका अंदाजापेक्षा २.०८ टक्के कमी दराची असल्याने ती लघुत्तम ठरली. पावसाळ्यासह नऊ महिन्यांच्या कालावधीत है काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, एक वर्षाच्या हमी कालावधीनंतर पुढील चार वर्षे संबंधित कंत्राटदारालाच या यंत्रणेची सर्वसमावेशक देखभाल व परिरक्षण करावी लागणार आहे. यासाठी लागणारा खर्च पालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून केला जाणार असून, स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai bmc headquarters 87 ai cctv cameras security upgrade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Mumbai Municipal Corporation
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

निलंबित एपीआयच्या  आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?
1

निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली
2

नाना पाटेकरांच्या निधनाने रझा मुराद भावुक; आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव
3

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार
4

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वाहतूक-लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र प्राधिकरण, १० वर्षांचा मास्टर प्लॅन होणार तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.