Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनला भीषण आग; मेट्रो सेवा ठप्प, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मेट्रो सेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली आहे. मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशन हे अंडरग्राऊंड आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 15, 2024 | 03:01 PM
बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनला भीषण आग; प्रवाशांमध्ये गोंधळ (फोटो सौजन्य-X)

बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनला भीषण आग; प्रवाशांमध्ये गोंधळ (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Metro Fire update: मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. भूमिगत असलेल्या या मेट्रो स्थानकात आगीमुळे धुराचे लोळ उठल्याने एकच खळबळ उडाली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून प्रवासी सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे या घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नाही. दरम्यान मुंबई मेट्रो-3 च्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनचे काम सुरू असलेल्या परिसरात आज दुपारी 1 वाजून 9 मिनिटांच्या सुमारास आग लागली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

🚨 Notice: Passenger services at BKC station are temporarily closed due to a fire outside Entry/Exit A4, which caused smoke to enter the station. Fire Brigade is on the job. For passenger safety, we have paused services. Senior Officers of MMRC & DMRC are at site. Please proceed…

— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) November 15, 2024

आग कशी लागली?

भूमिगत मेट्रो स्थानकातील तळघरात असलेल्या लाकडी साहित्य आणि फर्निचर ठेवलेल्या ठिकाणी ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम कार्यरत असून सर्वच प्रवाशांना अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनमधून बाहेर काढण्यात आले आहे.

मेट्रो स्टेशनला लागलेली ही आग लेव्हल 2 ची असल्याची माहिती मिळत आहे. बीकेसी स्टेशनवरील सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून मेट्रोमधील प्रवासी सुखरुप आहे.आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती मेट्रोनं दिली. तसेच तात्पुरत्या स्वरुपात बांद्रा कॉलनी स्टेशनवरुन ग्राहकांना मेट्रो पकडण्याची मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 5 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो किंवा मुंबई मेट्रो लाइन 3 चे उद्घाटन केले. PM मोदींच्या हस्ते या भूमिगत मेट्रोच्या लाइन 3 चे लोकार्पण झाल्यामुळे मुंबईकरांना एक भेट मिळाली आहे. या मेट्रोमध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते आरेपर्यंत 10 स्थानके असतील. तुम्हाला या ट्रेनची तिकीट किंमत, मार्ग, वेळ आणि वेळापत्रक याबद्दल सर्व माहिती मिळावी जेणेकरुन तुमचा वेळ वाचू शकेल आणि सुविधांसह ट्रेनला जाता येईल.

मुंबई मेट्रो लाइन 3 ची स्थानके

या मुंबई मेट्रो लाइन 3 मध्ये BKC, वांद्रे कॉलनी, सांताक्रूझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) T1, सहार रोड, CSMIA T2, मरोळ नाका, अंधेरी, सीप्झ आणि आरे कॉलनी JVLR स्थानकांदरम्यान 10 स्थानके आहेत.

 किती गाड्या दररोज आणि किती वाजता धावतील?

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) आरे आणि BKC दरम्यान दररोज 96 सेवा चालवणार आहे. ट्रेन सुमारे 3-4 मिनिटे असेल म्हणजेच ही ट्रेन दर 3-4 मिनिटांनी भेटेल.

मुंबई मेट्रो लाईन 3 च्या वेळा

पहिली ट्रेन सकाळी 6.30 वाजता तर शेवटची ट्रेन रात्री 10.30 वाजता धावेल. त्याची पहिली ट्रेन रविवारी सकाळी 8.30 वाजता धावणार आहे.

मुंबई मेट्रो लाईन 3 चे भाडे किती असेल?

या ट्रेनचे किमान भाडे 10 रुपये प्रति तिकीट आणि कमाल भाडे 50 रुपये प्रति तिकीट असेल.

Web Title: Mumbai fire breaks out near bandra kurla complex metro station passengers evacuated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • metro 3
  • Mumbai

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
2

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
3

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
4

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.