Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Ganesh Murti Collapse : गणेशोत्सवाला पुन्हा एकदा गालबोट! कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर तोल गेला अन् गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली

Mumbai Ganesh Murti Collapse : मुंबईच्या कुर्ला पश्चिम भागात गणेशमूर्ती नेत असताना अचानक वाहनाचा तोल गेल्याने मूर्ती रस्त्यावर कोसळली. घटनेनंतर काही काळ परिसरात गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

  • By विवेक
Updated On: Sep 08, 2026 | 10:13 PM
Ganesh murti fallen in kurla

Ganesh murti fallen in kurla

Follow Us
Follow Us:
  • कुर्ल्यात स्पीड ब्रेकरवर वाहनाला धक्का बसल्याने गणेशमूर्ती रस्त्यावर कोसळली.
  • मूर्ती पडताच कार्यकर्ते आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली.
  • पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती आटोक्यात; सुदैवाने जीवितहानी नाही.
 

Mumbai Ganesh murti collapse : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच कुर्ला पश्चिमेतील शीतल तलाव परिसरात मंगळवारी (दि. ८) एक धक्कादायक घटना घडली. नवपाडा भागातील एका गणेश मंडळाची मूर्ती वाहनातून वाजतगाजत धारावीच्या दिशेने नेली जात होती. सगळं सुरळीत सुरू असतानाच शीतल तलावाजवळ वाहन स्पीड ब्रेकरवर आलं आणि अचानक जोरदार धक्का बसला. धक्क्यामुळे वाहनावरील गणेशमूर्तीचा तोल गेला आणि काही क्षणांतच मूर्ती थेट रस्त्यावर कोसळली. अचानक समोर घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांची एकच धावपळ उडाली. काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थिती हातात घेत नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यामुळे परिस्थिती बिघडण्यापूर्वीच सगळं आवरता आलं.

पोलिसांच्या उपस्थितीत मूर्तीचे विसर्जन

यानंतर पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने मंडळाच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, याची काळजी घेत संबंधित गणेशमूर्तीचे जवळच असलेल्या शीतल तलावात शांततेत विसर्जन करण्यात आले.

Mumbai Goa Highway Traffic: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार असाल तर महत्त्वाची बातमी! मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

या संपूर्ण प्रकारात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिसरातील वातावरणही काही वेळात पूर्वपदावर आलं.

भुलेश्वरमधील घटनेनेही उडाली होती खळबळ

दरम्यान, मुंबईत नुकतीच काही दिवसांपूर्वी, गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्ती कोसळण्याची गंभीर घटना घडली होती. भुलेश्वर परिसरात ‘भुलेश्वरचा राजा’ची तब्बल २२ फूट उंच मूर्ती मंडपापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर असताना अचानक कोसळली होती. या दुर्घटनेत मंडळाच्या अध्यक्षांसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे कुर्ल्यातील आजच्या घटनेत जीवितहानी टळल्याने मोठा धोका टळल्याचं दिसून आलं.

असं असतानाच आता पुन्हा एकदा गणेशमूर्तींच्या उंचीबाबत आणि मुंबईच्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत चर्चा सुरु झाली आहे. आता गणेश मंडळे आणि प्रशासन यवर काय तोडगा काढणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Mumbai News: डीजे, लेझरच्या झगमगाटामुळे आरोग्य धोक्यात! श्रवणशक्ती कमी होण्याची आणि दृष्टी जाण्याचीही भीती; आयएमएचा गंभीर इशारा

Web Title: Mumbai ganesh murti collapse kurla ganesh idol falls on road shital talav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 10:13 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News : ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा एल्गार! SIR वरून मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक
1

Mumbai News : ज्ञानेश कुमारांविरोधात पुन्हा एल्गार! SIR वरून मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक

Mumbai News : मुंबईकरांनो, लक्ष द्या! 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी, मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा आदेश
2

Mumbai News : मुंबईकरांनो, लक्ष द्या! 25 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी, मुंबई पोलिसांचा महत्त्वाचा आदेश

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच
3

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच

दु:खद! मुंबईत गरबा खेळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू; गोरेगावमधील धक्कादायक घटना
4

दु:खद! मुंबईत गरबा खेळताना १९ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू; गोरेगावमधील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.