Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना! मुंबईत मूर्तिकारांना ४०९ टन शाडू मातीचे मोफत वाटप

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदाही मूर्तिकारांना मोफत शाडू माती आणि नैसर्गिक रंग उपलब्ध करून देण्याची योजना सुरू ठेवली आहे. आतापर्यंत ४०९ टन शाडू मातीचे वाटप करण्यात आले असून यंदा मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2026 | 01:00 PM
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना! मुंबईत मूर्तिकारांना ४०९ टन शाडू मातीचे मोफत वाटप

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना! मुंबईत मूर्तिकारांना ४०९ टन शाडू मातीचे मोफत वाटप

Follow Us
Follow Us:
  • मुंबई महापालिकेकडून आतापर्यंत ४०९ टन शाडू मातीचे मोफत वाटप करण्यात आले.
  • पर्यावरणपूरक मूर्तींसाठी २५,४०० लिटर नैसर्गिक रंगांचे वितरण करण्याची तयारी.
  • POP मूर्तींवर बंदी कायम; कृत्रिम तलावांची संख्या वाढवून पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन.
मुंबई महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव या मोहिमेला यंदाही मोठी बळकटी देण्यात आली आहे. मुंबई महानगरात शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याकरिता महापालिकेकडून मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात येत आहे. पालिकेकडून प्रत्येक परिमंडळात आवश्यकतेनुसार विनामूल्य माती उपलब्ध करून देण्यात येत असून आतापर्यंत एकूण ४०९ टन इतक्या शाडू मातीचे मोफत वाटप करण्यात आले आहे. यंदा शाडू मातीच्या मागणीचा हा आकडा १ हजार टनाहून अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Bombay High Court : धर्माच्या नावावर मतांची मागणी नाही; ‘दुआ’ आणि ‘आमीन’ संदर्भात बॉम्बे हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

यंदा सर्वाधिक शाडू मातीचे वाटप डी विभाग, एफ साऊथ आणि के ईस्ट या विभागांमध्ये झाले आहे. यामध्ये के ईस्ट विभागात सर्वाधिक ६८ टन्, डी विभागात ५८ टन तर एफ साऊथ विभागात ४७ टन मातीचे वाटप करण्यात आले आहे. याउलट बी विभाग आणि के नॉर्थ अशा काही विभागांमधून सध्या कमी मागणी आली आहे. परंतु गणेशोत्सवापर्यंत या मागणीत नक्कीच वाढ होण्याची शक्यता पालिकेच्या अधिका-यांनी व्यक्त केली आहे. केवळ शाडू मातीच नव्हे, तर पालिका मूर्तिकारांना नैसर्गिक रंगांचीही मदत करत असून यंदा २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंगांचे वितरण करण्यासाठी १.६३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी

मुंबई उच्च्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि पालिकेच्या सूचनेनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीवर बंदी असून, ६ फुटापेक्षा उंच मूर्तीचेच विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्यास परवानगी आहे.
त्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोतांवरील ताण कमी करण्यासाठी पालिकेकडून कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात येत आहे. गेल्या वर्षी शहर व उपनगरात २९८ कृत्रिम तलावांची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती, ज्यामध्ये जवळपास ९८ टक्के म्हणजेच १ लाख ८४ हजार घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते.

SRA Project: उच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ? मालाडमध्ये क्लासिक ट्रेझरचे कार्यालय जेसीबीने हटवल्याचा दावा

नागरिक, मूर्तिकारांना सातत्याने आवाहन

यंदाही कृत्रिम तलावांची संख्या वाढवून गणेशोत्सव अधिक निसर्गरम्य आणि पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करण्यासाठी पालिका सातत्याने नागरिकांना व मूर्तिकारांना आवाहन करत आहे, ज्या मूर्तिकारांना आणखी शाडू माती हवी असेल, त्यांनी महापालिकेच्या संकेतस्थळावर ‘नागरिकाकरिता या रकान्यामध्ये ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करून मागणी नोंदवावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai ganeshotsav 2026 free shadu mati distribution natural colours bmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Ganeshotsav
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश
1

Virar: वसई-विरारच्या विकासावर मुंबईत बैठक! अतिरिक्त FSI प्रकरणी चौकशीचे आदेश

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?
2

Ravikant Tupkar :बँक निवडणुकीसाठी एकत्र येता, मग शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री दालनात एकत्र का बसत नाही?

Chandrapur News: कॅशबुक, पासबुक, चेकबुकसह कागदपत्रे बाहेर; खडसंगी ग्रामपंचायतीत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी
3

Chandrapur News: कॅशबुक, पासबुक, चेकबुकसह कागदपत्रे बाहेर; खडसंगी ग्रामपंचायतीत नेमकं काय घडलं? ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकचा गाळ पुन्हा चर्चेत; 1000 ट्रक गाळाच्या नोंदीवरून प्रश्नचिन्ह
4

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकचा गाळ पुन्हा चर्चेत; 1000 ट्रक गाळाच्या नोंदीवरून प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.