Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष मेगाब्लॉक; ‘या’ स्थानकांदरम्यान लोकल गाड्या ठप्प

कसारा मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आसनगाव-कसारा दरम्यान रेल्वेच्या महत्त्वाच्या कामांसाठी ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला असून, याचा परिणाम लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2026 | 01:55 PM
कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष मेगाब्लॉक; 'या' स्थानकांदरम्यान लोकल गाड्या ठप्प

कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विशेष मेगाब्लॉक; 'या' स्थानकांदरम्यान लोकल गाड्या ठप्प

Follow Us
Follow Us:
  • आसनगाव-कसारा दरम्यानच्या रेल्वे मार्गावरील कामामुळे लोकल सेवांच्या वेळेत मोठे बदल होणार आहेत.
  • ७ ऑक्टोबरला ब्लॉकपूर्वी आणि ब्लॉकनंतर कसारा मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
  • मुंबईकडे ये-जा करणाऱ्या काही लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिराने धावणार आहेत.
तुम्हीही दररोज कसारा मार्गिकेदरम्यान प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आसनगाव-कसारा दरम्यान तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरु करण्यासाठी आणि कसारा ‘अप’ यार्ड मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात येणार आहे. यासाठी ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान मध्य रेल्वेवर विशेष ब्लाॅक सुरु करण्यात येईल. या ब्लॉकचा परिणाम नाशिकमार्गे मुंबईकडे आणि मुंबईहून कसारा दिशेने जाणाऱ्या अनेक मेल-गाड्यांवर होणार आहे. इगतपूरी येथून काही गाड्यांना रेगूलेट केले जाणार आहे तर काही गाड्यांना खर्डी आणि आटगाव येथे थांबविले जाणार आहे. (Mumbai Kasara Local Train Block)

महाराष्ट्राच्या जलसुरक्षेवर उष्णसंकट! कोकण-गोव्यात उष्ण मान्सून हवामान पट्टा वाढला

रेल्वे वाहतूकीवर होणार परिणाम

या कालावधीमध्ये प्री-नॉन-इंटरलॉकिंग, नॉन-इंटरलॉकिंग आणि पोस्ट-नॉन-इंटरलॉकिंगसारखी अनेक कामे पार पाडली जाणार आहेत. या ब्लाॅकचा आता रेल्वे वाहतूकीवर मोठा परिणाम होणार असून दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची याकाळात तारांबळ उडणार आहे. माहितीनुसार, या ब्लाॅकमुळे आसनगाव आणि कसारादरम्यानच्या सेवा उपलब्ध राहणार नाहीत. यामुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल केला जाईल तर काही गाड्या रद्द केल्या जातील.

७ ऑक्टोबर रोजी ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसटीहून कसाऱ्याच्या दिशेने धावणारी शेवटची लोकल दुपारी १२.३० वाजता सुटणार आहे. त्याच दिवशी कसाऱ्याहून सीएसटीकडे जाणारी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल दुपारी २.४२ वाजता रवाना होईल. ब्लॉक संपल्यानंतर सीएसटीहून कसाऱ्यासाठी पहिली लोकल सायंकाळी ६.२८ वाजता, तर कसाऱ्याहून सीएसटीसाठी पहिली लोकल रात्री ८.३५ वाजता सुटणार आहे. दरम्यान, ८ आणि ९ ऑक्टोबर रोजीही लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले असून, ब्लॉकपूर्वी तसेच ब्लॉकनंतरच्या फेऱ्यांच्या वेळांमध्येही बदल होणार आहेत.

ब्लाॅकमुळे काय बदल होणार?

मध्य रेल्वेच्या म्हणण्यानुसार, आसनगाव आणि कसारादरम्यानचे हे काम कल्याणच्या तिसऱ्या आणि चाैथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचा एक भाग असणार आहे. मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर मेल-एक्सप्रेस आणि उपनगरीय गाड्यांची वाहतून स्वतंत्र करण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे रेल्वे मार्गाची क्षमत वाढवून अतिरिक्त गाड्यांची वाहतून अधिक सुरळीत करण्यास मदत होईल.

मुंबईत घर खरेदीत झाली मोठी वाढ; सप्टेंबरमध्ये घर नोंदणीचा नोंदवला नवा उच्चांक

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बदल

आसनगाव आणि कसारादरम्यानच्या या रेल्वे ब्लाॅकमुळे मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडून येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे. एलटीटी-बनारस, एलटीटी-पाटलीपुत्र, सीएसटी-अमृतसर, सीएसटी-बनारस महानगरी आणि एलटीटी-कुशीनगर एक्स्प्रेस यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच गोरखपूर-एलटीटी, पुष्पक एक्स्प्रेस, अयोध्या कँट-एलटीटी, बलिया-दादर आणि ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस या ब्लाॅकदरम्यान इगतपूरी येथून रेगूलेट केल्या जाणार आहेत. भुसावळ विभागातूनही काही गाड्या रेगूलेट केल्या जाणार आहेत. ब्लाॅकदरम्यान गाड्यांना विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे नियमित प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.

 

Web Title: Mumbai kasara local train block asangaon kasara october railway timetable changes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • Central Railway Mega Block
  • Mega block
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईत घर खरेदीत झाली मोठी वाढ; सप्टेंबरमध्ये घर नोंदणीचा नोंदवला नवा उच्चांक
1

मुंबईत घर खरेदीत झाली मोठी वाढ; सप्टेंबरमध्ये घर नोंदणीचा नोंदवला नवा उच्चांक

Mumbai News: रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क
2

Mumbai News: रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra
3

Navi Mumbai : APMC कांदा-बटाटा मार्केट बंदवर तात्पुरता तोडगा; मंगळवारी मंत्रालयात बैठक* | Navarashtra

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा
4

BJP Mumbai : देशात अराजकता पसरवणाऱ्या कचऱ्याला बाहेर काढा – मंत्री मंगलप्रभात लोढा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.