मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण सेंट्रल आणि हार्बर या रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक असणार आहे.
अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान पादचारी पुलाच्या मेन गर्डरच्या लॉंचींगसाठी अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान ०१:३० ते ०३:०० (मध्यरात्री) वाजेपर्यंत अप आणि डाउन मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.
रविवार मध्य रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तसेच वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 दरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या डाऊन लाईन सेवा रद्द केल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी सेक्शन मध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील. ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध असतील.
मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात…