
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, पाहा कधी आणि कुठे? (फोटो सौजन्य-X)
Mumbai Local Megablock News Marathi: उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवार, २५ जानेवारी रोजी मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे रविवारी विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना गदींचा सामना करावा लागणार आहे. माटुंगा ते मुलुंड स्थानका दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. परिणामी लोकल १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. या ब्लॉकवेळेत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही फेऱ्या उशिराने धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर
कुठे- माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी – सकाळी 11.05 ते दुपारी 3.45
परिणाम- ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर धावणाऱ्या लोकल फेऱ्या अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर चालवल्या जातील. यामुळे काही लोकल गाड्या रद्द होतील आणि काही लोकल गाड्या उशिराने धावतील.
हार्बर मार्गावर
कुठे – सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन
कधी – सकाळी 11.40 ते दुपारी 4.40
परिणाम- ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव मार्गावरील अप आणि डाउन लोकल गाड्या रद्द राहतील. ब्लॉकवेळेत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक
रविवारी, अंधेरी ते गोरेगाव आणि माहिम ते अंधेरी स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत उत्प आणि डाउन हार्बर मार्गावर दुरुस्ती करण्यात येणार आहे. बलॉक दरम्यान सीएसएमटी ते बांद्रा, गोरेगाव आणि गोरेगाव ते पनवेल लोकलची वाहतूक रद्द केली आहे, तसेच चर्चगेट ते गोरेगाव दरम्यानच्या काही लोकल रद्द केल्या आहेत.
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, बांद्रा दरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत दुरुस्ती असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते चुनाभट्टी, बांद्रा दरम्यानची लोकल वाहतूक बंद असणार आहे.