Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २७ जानेवारीपासून ‘या’ भागांत १० टक्के पाणीकपात; पाहा संपूर्ण यादी

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 24, 2026 | 10:09 AM
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २७ जानेवारीपासून 'या' भागांत १० टक्के पाणीकपात (Photo Credit- X)

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २७ जानेवारीपासून 'या' भागांत १० टक्के पाणीकपात (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!
  • २७ जानेवारीपासून ‘या’ भागांत १० टक्के पाणीकपात
  • पाहा संपूर्ण यादी
Mumbai Water Cut News: मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिरक्षणाचे काम २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने घेतला आहे. त्याचचरोबर महापालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील विभागांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. या कालावधीत मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषतः पूर्व उपनगरात आधीच पाण्याची समस्या असताना या दुहेरी समस्याचा सामना करावा लागणार आहे.

‘या’ ठिकाणी बसणार फटका

शहरातील ‘ए’ विभागातील नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र, ‘बी’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘सी’ विभागातील भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला परिसर, ‘ई’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘एफ दक्षिण’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘एफ उत्तर’ विभागातील संपूर्ण परिसर, पूर्व उपनगरांतील ‘टी’ विभागातील मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) परिसर, ‘एस’ विभागातील भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) परिसर, ‘एन’ विभागातील विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर परिसर, ‘एल’ विभागातील कुर्ला (पूर्व), ‘एम पूर्व मधील संपूर्ण विभाग, ‘एम पश्चिम’मधील संपूर्ण विभागात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर; महायुतीमधील ‘हॉटेल डिप्लोमसी’

न्यूमॅटिक गेट सिस्टिमचे करणार परिरक्षण

मुंबई महानगरपालिकेला पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम २७ जानेवारी ते ७ पेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमधील महापालिकेच्या बहुतांश प्रशासकीय विभागांतील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील काही भागांमध्ये ही १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.

पाणी काटकसरीने वापरा : पालिका

सर्व संबंधित परिसरांमधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच, महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

‘प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलात तर पगार…’, मुंबई उच्च न्यायालयाचा बीएमसी आणि नवी मुंबई आयुक्तांना इशारा

Web Title: Mumbai residents use water sparingly 10 percent water cut in these areas from january 27th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • BMC
  • Mumbai
  • mumbai water cut

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला
1

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन
2

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
3

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

ED Officers Extortion:  ED च्या अधिकाऱ्यांनीन घातला व्यापाऱ्याला 2.25 कोटींचा गंडा; नेमकं घडलं काय?
4

ED Officers Extortion:  ED च्या अधिकाऱ्यांनीन घातला व्यापाऱ्याला 2.25 कोटींचा गंडा; नेमकं घडलं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.