Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local: चर्चगेट आणि मरीन लाईन्सदरम्यान शॉर्टसर्किट, विद्युत वाहिनीवर झाड पडल्यामुळे शॉर्टसर्किट

मुंबईत गेल्या काही तासांपासून पाऊस सुरु आहे. याचापरिणाम मुंबई लोकलवर दिसून येत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपण ठप्प झाली होती . तर दुसरीकडे चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान शॉर्टसर्किट झाल्याची माहिती मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 26, 2025 | 03:28 PM
चर्चगेट आणि मरीन लाईन्सदरम्यान शॉर्टसर्किट (फोटो सौजन्य-X)

चर्चगेट आणि मरीन लाईन्सदरम्यान शॉर्टसर्किट (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Mumbai Local Update in Marathi: मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये आज सकाळपासून तुफान पाऊस पडत असून अनेक रस्ते, रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले आहेत. मुंबई मागील १०० वर्षांतील मे महिन्यांतील रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्याचे सांगितले जात आहे. कोकणातही मुसळधार सुरू असून रायगड आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दूसरीकडे या मुसळधार पावसाचा परिणाम लोकल वाहतुकीवर दिसून येत आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरीन लाईन्स स्थानकादरम्यान विद्युत वाहिनीवर झाड कोसळल्याने शॉर्ट सर्किट झाल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी अनेक भागात पाणी साचलं आहे. त्याचे परिणाम वाहतुकीवर दिसून येतात. मुंबई पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मरीन लाईन लोकल स्थानकांदरम्यान अचानक शॉर्ट सर्किटमुळे मोठा स्फोट झाला. विद्युत वाहिनीवर झाड आल्याने त्याला देखील आग लागल्याची घटनाही घडली आहे.

साताऱ्यातील कास रोडवर भले मोठे झाड कोसळले; युवकांच्या योगदानातून झाड हटवून वाहतूक पूर्ववत

मुंबईत सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडला. मुंबई महापालिकेच्या काही ऑटोमॅटिक वेदर स्टेशनवर एका तासात 80 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर आयएमडीने म्हटले आहे की सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान झालेला पाऊस हा अचानक झाला. आयएमडीनुसार, दक्षिण मुंबईत अत्यंत मुसळधार पाऊस पडेल. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार रमंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे किती पाऊस पडला?

कुलाबा अग्निशमन केंद्रात ७७ मिमी, ग्रँट रोड आय हॉस्पिटलमध्ये ६७ मिमी, मेमनवाडा अग्निशमन केंद्रात ६५ मिमी, मलबार हिलमध्ये ६३ मिमी आणि डी वॉर्डमध्ये ६१ मिमी पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरांबद्दल बोलायचे झाले तर, तेथे तुलनेने कमी पाऊस पडला आहे. मानखुर्द अग्निशमन केंद्र आणि एपीएस स्कूल मानखुर्दमध्ये फक्त १६ मिमी, नूतन विद्यालय मंडळात १४ मिमी आणि कलेक्टर कॉलनीमध्ये १३ मिमी पावसाची नोंद झाली.

पश्चिम उपनगरात, वांद्रे सुपारी टाकी, गजदरबंद पंपिंग स्टेशन आणि खार दांडा येथे २९ मिमी पाऊस पडला, तर स्वच्छता विभाग कार्यशाळा, एचई वॉर्ड ऑफिस आणि विलेपार्ले अग्निशमन केंद्रात २२ मिमी पाऊस पडला.

Mumbai Metro 3: मुंबईतील भुयारी मेट्रो पाण्यात, आचार्य अत्रे स्थानकात पाणीच पाणी…; पहिल्या पावसाने विकासाचं पितळ पाडलं उघडं

Web Title: Mumbai local short circuit between churchgate and marine line railway line due to a tree falling on the electrical lines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Mumbai Local
  • railway
  • Western Railway

संबंधित बातम्या

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना
1

Mumbai Crime: धावत्या लोकलमधून फेकला नारळ, डोक्याला लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; भाईंदर खाडी पूलावर दुर्दैवी घटना

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ स्थानकातील प्लॅटफॉर्म 3 महिने राहणार बंद, कोणत्या ट्रेनवर परिणाम?
2

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ स्थानकातील प्लॅटफॉर्म 3 महिने राहणार बंद, कोणत्या ट्रेनवर परिणाम?

Bullet Train Update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दिली महत्त्वाची माहिती
3

Bullet Train Update : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दिली महत्त्वाची माहिती

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास
4

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.