Mumbai Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! या मार्गावर लोकल धावणार नाही, प्रवासापूर्वी रेल्वेचं वेळापत्रक वाचा
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही उद्या मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर त्यापूर्वी रेल्वेचं वेळापत्रक वाचा. कारण उद्या मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर उद्या हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे. कारण उद्या रविवारी 24 नोव्हेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात आणि हार्बर रेल्वे मार्गावर दिवसाच्या वेळेत कोणताही ब्लॉक असणार नाही.
मुंबईसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
रविवार, 24 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेने विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. ठाणे ते दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात, अनेक जलद गाड्या धिम्या मार्गावर वळवल्या जातील तर अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहून घाराबाहेर पडावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरून सकाळी 09.57 वाजता सुटणाऱ्या आणि दुपारी 02.42 वाजता आसनगाव येथून सुटणाऱ्या डाऊन फास्ट/सेमी फास्ट लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवर देखील थांबणार आहेत. तसेच काही गाड्यांचा प्रवास 10 ते 15 मिनिटांनी उशिराने सुरु असेल. प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 दरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या डाऊन लाईन सेवा रद्द केल्या जाणार आहेत. तसेच वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 दरम्यान ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप लाईन सेवा देखील रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. तसेच ब्लॉक कालावधीत सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेससह अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मध्य रेल्वे, रेल्वे भर्ती बोर्ड परीक्षा उमेदवारांसाठी मुंबई आणि नागपूर दरम्यान 10 विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या विशेष ट्रेन्सच्या थांब्यांची माहिती http://enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲप उपलब्ध आहे. या गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपूरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, शेगाव, अकोला, धामणगाव, वर्धा, मूर्तिजापूक आणि बडनेरा या स्थानकांवर थांबतील.
मध्य रेल्वे, रेल्वे भर्ती बोर्ड परीक्षा उमेदवारांसाठी मुंबई आणि नागपूर दरम्यान १० विशेष ट्रेन चालवणार आहे.
या विशेष ट्रेन्सच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया https://t.co/5VaUUo1VJQ ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.#CentralRailway #SpecialTrains pic.twitter.com/A8mKFaIwvM— Central Railway (@Central_Railway) November 22, 2024