फोटो सौजन्य- सोशल मीडिया
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या काही तासातच मतमोजणी केली जाणार आहे. मुंबईकडे सर्वांचे लक्ष लागले असून विशेषत: मुंबई शहरातील 10 मतदारसंघांवर कोणाचे वर्चस्व असणार हा औत्सुक्याचा विषय आहे. शहरातील विधानसभा मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.मतदान केंद्रांवरील आवश्यक त्या सोयीसुविधा व उपाययोजनांबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे पाहणी करुन सातत्याने आढावा घेत आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी फेऱ्या
धारावी विधानसभा मतदारसंघ – १९ मतमोजणी फेऱ्या, सायन-कोळीवाडा – २०, वडाळा -१६, माहीम – १८, वरळी – १७, शिवडी – १९, भायखळा – १९, मलबार हिल – २०, मुंबादेवी – १७, कुलाबा – १९ अशा मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.
मतमोजणी केंद्राच्या ३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू
जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटर त्रिज्येच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई असेल, असे आदेश पोलीस प्रशासनाने निर्गमित केले आहेत.
मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मीडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकारपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मीडिया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मीडिया सेंटर येथे जमा करावा लागेल.
मतदार संघ व मतमोजणी केंद्र
धारावी – भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, तळमजला, किचन रूम, धारावी बस आगाराच्या जवळ, सायन वांद्रे लिंक रोड, धारावी, मुंबई – ४०००१७.
सायन कोळीवाडा – न्यू सायन मुन्सिपल स्कूल, प्लॉट नंबर 160/ 161, स्कीम सहा, रोड नंबर 28, लायन ताराचंद बाप्पा हॉस्पिटल जवळ, सायन पश्चिम, मुंबई-४०००२२.
वडाळा – बीएमसी नवीन इमारत, सीएस नंबर ३५५ बी, स्वामी वाल्मिकी चौक, हनुमान मंदिरासमोर, विद्यालंकार मार्ग, अँटॉप हिल, मुंबई-३७
माहीम – डॉक्टर अँटनिओ डी’साल्व्हिया हायस्कूल, एमरोल्ड हॉल, दादर, मुंबई-28.
वरळी – पश्चिम रेल्वे जिमखाना हॉल, सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी क्रीडा मैदान
शिवडी – ना. म. जोशी मार्ग, बीएमसी प्राथमिक शाळा क्रमांक दोन, लोअर परळ, मोनो रेल स्टेशन जवळ, ना.म. जोशी मार्ग, करी रोड, मुंबई-११.
भायखळा – रिचर्डसन अँड क्रूडास लिमिटेड, तळमजला हॉल, जे जे रोड, ह्युम हायस्कूल जवळ, भायखळा, मुंबई-०८
मलबार हिल – विल्सन कॉलेज, तळमजला, रूम नंबर १०२, १०४, नेताजी सुभाष चंद्र मार्ग, गिरगाव चौपाटी, चर्नी रोड, मुंबई-०७.
मुंबादेवी – तळमजला, गिल्डर लेन, बीएमसी शाळा, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन समोर, मुंबई सेंट्रल पूर्व, मुंबई-०८.
कुलाबा – न्यू अप्लाइड आर्ट असेंबली हॉल (एक्झिबिशन हॉल), जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई –