मुंबईकरांना मार्चअखेर मिळणार मोठं गिफ्ट; मेट्रो-३ लवकरच प्रवाशांच्या सेवेत
मुंबईकरांना मार्च अखेर आणखी एक मेट्रोचं गिफ्ट मिळू शकतं. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो 3 प्रकल्पाच्या बीकेसी – कुलाबा पर्यंतचं ९३.१ टक्के काम पूर्ण झालं आहे. मार्च 2025 अखेर प्रवासी सेवेसाठी हा मेट्रो मार्ग सुरू करण्याचं लक्ष्य आहे. विधानसभेतील विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेतला होता. महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्यामध्ये या विस्ताराचा समावेश करण्यात आला होता.
bhiwandi perfume factory fire: परफ्यूम गोदामाला भीषण आग, ८ तासांपासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
मुंबई मेट्रोच्या या महत्त्वाच्या टप्प्यात बीकेसी-आचार्य अत्रे चौक आणि वरळी स्थानकांचं बांधकाम वेगाने सुरू आहे. त्यामुळे लवकरच मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ‘फेज 2A’ च्या बांधकामासोबतच त्याची रचना आणि पद्धतशीर कार्ये देखील अंतिम केली जात आहेत. सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर हा टप्पा वाहतूक सेवेत आणण्यासाठी आवश्यक असलेली अंतिम मंजुरी मिळेल. या टप्प्याचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईच्या वाहतूक कोंडीला दिलासा मिळू शकेल, अशी माहिती MMRC च्या अधिकाऱ्यांनी दिली.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लान? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
मुंबई मेट्रो मार्गाची म्हणजे एक्वालाइनची एकूण लांबी 33.5 किलोमीटर असून या मार्गावर एकूण 27 स्थानके आहेत. हे कॅफे परेड BKC आणि आरे JVLR ला जोडते. 12.69 किमी लांबीच्या या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर 2024 मध्ये फेज-1 मध्ये केले होते. या मार्गाचा आणखी एक भाग मार्चमध्ये सुरू होणार आहे. हा मार्ग बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत आहे. आचार्य अत्रे चौकापर्यंत मेट्रो गेल्याने बीकेसी ते वरळी दरम्यान मेट्रोची जोडणी होणार आहे.
मुंबईच्या वाहतूक या पायाभूत सुविधांचा कायापालट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भूमिगत भुयारी मार्गासाठी यशस्वीरित्या आर्थिक नियोजन केले आहे. ज्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या लार्ज कॉर्पोरेट शाखा, मुंबई यांनी ७३२६ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. हे एमएमआरडीएची मजबूत आर्थिक विश्वासार्हता तसेच जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवण्याच्या वचनबद्धतेची प्रचिती देते.
६.२३ किमी लांबीच्या या बोगद्यासाठी एका महाकाय टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) चा वापर केला जाईल. बोगद्याचा व्यास ११ मीटर असेल. हा बोगदा जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे १५ ते २० मीटर खाली असेल. अशा परिस्थितीत, बोगदा खोदण्याचे काम जमिनीखालून सुरू होईल. टीबीएम लाँचिंग शाफ्टद्वारे जमिनीत खाली आणले जाते.