Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: ड्रग्ज’ मृत्यू प्रकरणाने मुंबई हादरली! मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली तातडीची बैठक; ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा इशारा

मुंबईतील नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी तातडीची बैठक बोलावली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 17, 2026 | 08:03 PM
ड्रग्ज' मृत्यू प्रकरणाने मुंबई हादरली! मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली तातडीची बैठक (Photo Credit- X)

ड्रग्ज' मृत्यू प्रकरणाने मुंबई हादरली! मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली तातडीची बैठक (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • नेस्को सेंटरमधील ‘ड्रग्ज’ मृत्यू प्रकरणाने मुंबई हादरली!
  • मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बोलावली तातडीची बैठक
  • ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा
मुंबई १७: मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या (ड्रग्स) अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात अंमलीपदार्थ विरोधात राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे.

उपनगर जिल्ह्याचा सहपालकमंत्री या जबाबदारीने ह्या लढ्याचा एक भाग म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वांद्रे इथल्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवली असल्याचे मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. या बैठकीला उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आशिषजी शेलार, जिल्हाधिकारी श्री. सौरभजी कटियार यांच्यासह अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, उत्पादन शुल्क, महापालिका आणि संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

गोरेगाव येथील घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, प्रशासनाने त्वरीत आणि प्रभावी पावले उचलावीत अशी मागणी सध्या जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या सोमवारी २० एप्रिल २०२६ रोजी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दुपारी ४ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईत अमलीपदार्थांचा विळखा वाढू नये यासाठी प्रशासनाने ‘झिरो टोलेरन्स’ भूमिका घ्यावी. विशेषतः सार्वजनिक कार्यक्रम, प्रदर्शन आणि मोठ्या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यात यावी, तसेच अमलीपदार्थ विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या उद्देशाने ही बैठक असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत होणार देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प; ‘या’ प्रकल्पाचा मास्टर प्लॅन सादर

तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यात घेऊन देशाला कमजोर करणाऱ्यांच्या विरोधात कायदे अधिक कठोर करण्याची वेळ आली असून याबाबत एक लोकचळवळ उभी राहण्याची गरज असल्याचेही लोढा म्हणाले.

मंत्री लोढा यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्रिय करणे, तसेच युवकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे अत्यंत गरजेचे आहे. संबंधित प्रकरणात मुंबई पोलिस तपास करत आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी अतिशय बारकाईने या प्रकरणात लक्ष घालत आहेत. आयोजक आणि काही अमलीपदार्थ विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून त्यांना कडक शासन होईलच,पण या प्रकरणाच्या खोलात जाऊन पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे ही त्यांनी सांगितले.

मुंबईतल्या काही विशिष्ठ भागात बांगलादेशी आणि रोहिंग्याची मोठ्या प्रमाणात घुसखोरी वाढली आहे, त्यातूनही समाजविघातक शक्ती असल्या घटनांना जबाबदार असल्याचे नाकारता येत नाही. यादृष्टीनेही तपास पुढे गेला पाहिजे, असे ठाम मत मंत्री लोढा यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईची दुसरी ‘लाईफलाईन’ संकटात! बेस्टमध्ये 16 हजारांहून अधिक पदे रिक्त; अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सेवेवर परिणाम

Web Title: Mumbai nesco center drugs case mangal prabhat lodha calls high level meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • Drugs
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai

संबंधित बातम्या

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया
1

Medical Success Story: 20 वर्षीय तरुणीवर वॉकहार्टमध्ये यशस्वी मिनिमली इन्व्हेसिव्ह माइट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल
2

Mumbai protest : मुंबईत नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांचा दणका, चैत्यभूमी प्रकरणाची चौकशी सुरू; 8 गुन्हे दाखल

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
3

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Mhada Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा लॉटरीचे शेड्यूल लवकरच जाहीर;75 हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपणार
4

Mhada Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडा लॉटरीचे शेड्यूल लवकरच जाहीर;75 हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.