
mumbai local mumbra train accident reason Maharashtra news marathi
6 फेब्रुवारी रोजी आज सकाळी कर्जत रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची आणि शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांची मोठी गर्दी असते. आणि अशाचेवळी हा बिघाड झाल्याने सर्वच प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत- भिवपूरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत स्थानकाजवळ पेंटाग्राफ तुटल्यामुळे वाहतूकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं.
सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलांचा गोंधळ असतो आणि अशातच वाहतूक विस्कळीत झाली होती. सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला होता. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक रेल्वे स्थानकावर घोषणा केली जात होती, जेणेकरून इतर प्रवाशांना देखील याबाबत माहिती मिळू शकेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
घडलेल्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास कर्जत रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला होता. काही काळासाठी कर्जत- भिवपूरी स्थानकादरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र सुमारे दीड ते दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आता कर्जत-सीएसएमटी लोकल वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. मात्र आता देखील काही गाड्या उशीराने धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी उशीर होत आहे.
आज सकाळच्या सुमारास कर्जत रेल्वे स्थानकाजवळ पेटाग्राफ तुटला होता. त्यामुळे 7:30 वाजल्यापासून सुमारे दीड ते दोन तास कर्जत रेल्वे स्टेशनहून मुंबईच्या दिशेला येणारी लोकल वाहतूक बंद झाली होती. मात्र या काळात कर्जत रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम सुरु केलं. त्यानंतर कर्जत रेल्वे स्टेशनहून मुंबईच्या दिशेला येणारी लोकल वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे. रेल्वे वाहतूक सुरु झाली असली तरी देखील सध्या काही गाड्यांचा प्रवास उशीराने होत आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागत आहे.मंगळवारी पहाटे देखील मुंबईजवळील मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मुंबई लोकल ट्रेन सेवा प्रभावित झाली होती. दिवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान दक्षिणेकडे जाणाऱ्या धीम्या ट्रॅकवर पहाटे 4.55 वाजता सिग्नलच्या समस्येमुळे मुंबई लोकल ट्रेन सेवा किमान 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.
सोमवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबईतील लोकल गाड्यांमधील अंतर सध्याच्या 180 सेकंद वरून 120 सेकंदापर्यंत कमी केले जाईल. वंदे भारत रेक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकल ट्रेनमध्ये व्हेंटिलेशन आणि एअर कंडिशनिंग सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मंत्री म्हणाले.
मध्य रेल्वेची मुख्य लाईन दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ठाण्यातील कसारा आणि रायगड जिल्ह्यातील खोपोली आणि कर्जतपर्यंत आहे. मध्य रेल्वे त्यांच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर दररोज सुमारे 1800 रेल्वे चालवते. त्याच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग, ट्रान्स-हार्बर मार्ग आणि बेलापूर-उरण मार्गावर दररोज 35 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.