Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मेट्रो-रेल्वेनंतर आता रिक्षा, टॅक्सीही एका ॲपवर; एमएमआरडीएचा मोठा निर्णय

Mumbai News: मुंबईकरांचा सार्वजनिक वाहतुकीचा प्रवास आता आणखी सोपा होण्याची शक्यता आहे. मेट्रो, रेल्वे आणि बसच्या तिकिटांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मुंबई वन’ ॲपवर लवकरच रिक्षा, टॅक्सी, शेअर रिक्षा आणि बाइक टॅक्सी बुकिंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे. एमएमआरडीएच्या नियोजनानुसार, येत्या सहा महिन्यांत ही सेवा सुरू होऊ शकते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 28, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत ‘मुंबई वन स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’ सुरू केले
  • ॲप सुरू झाल्यापासून एका वर्षात १ कोटी ३२ लाखांहून अधिक तिकिटांची खरेदी झाली
  • लवकरच या ॲपवरून विमानाचे तिकीट बुक करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्याची योजना आहे
 

एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मुंबई वन स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’ कार्यान्वित केले असून या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे ॲप कार्यान्वित झाल्यापासून एका वर्षात यावरून १ कोटी ३२ लाखांहून अधिक तिकिटांची खरेदी झाली असून त्यातून ३२ कोटी रुपये महसूल मिळाला. या ॲपवरून मेट्रो, बेस्ट, रेल्वेसह ११ सेवांतील तिकीट उपलब्ध आहे. आता लवकरच टॅक्सी, रिक्षा, शेअर रिक्षा, बाइक टॅक्सीचे भाडेही या ॲपवरून अदा करता येणार असल्याची घोषणा एमएमआरडीएकडून करण्यात आली. सहा महिन्यांत ही सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

एमएमआरमध्ये प्रवासासाठी नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय म्हणून उपनगरीय रेल्वे, बेस्ट, एसटी, मोनो, मेट्रोचा वापर करतात. या वाहतूक व्यवस्थांचा वापर करताना प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळी तिकिटे खरेदी करावी लागतात. यात प्रवाशांचा वेळ जातो आणि त्यांना त्रासही होतो. ही बाब लक्षात घेऊन वेगवेगळी तिकिटे खरेदी करण्याच्या त्रासातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या कार्डची संपूर्ण जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली होती.

Mumbai Metro 12A : मानपाडा ते तळोजा मेट्रोला मंजुरी! ‘१८.४० किमीचा मार्ग, साडेतीन वर्षांत काम पूर्ण होणार’ – मुख्यमंत्री फडणवीस

 ॲपमध्ये बदलाचे काम सुरू

मुंबईतील रिक्षा, टैंटैक्सी, शेअर रिक्षा आणि बाइक टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांना टॅक्सी, रिक्षा, शेअर रिक्षा आणि बाइक टॅक्सीचे आरक्षण या अॅपवरून लवकरच करता येणार आहे. भाडे आकारणीही करता येणार आहे. यासाठी अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत ही सेवा सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

लवकरच विमानाचे तिकीटही काढण्याची होणार सोय

ही सेवा ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली. हे ॲप मुंबईतील सहा मेट्रो मार्गिका, नवी मुंबई मेट्रो मार्गिका उपनगरीय रेल्वे, बेस्ट बससह नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, मिरा भाईंदर महापालिकेच्या बस सेवासह ११ सेवांसाठी सध्या वापरात आहे. तर लवकरच विमानाचे तिकीटही काढण्याची सोय यावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट ! दिवाळीपूर्वीच योजनेचे मिळणार 3000 रुपये?

एमएमआरडीएने आता ‘मुबई वन’ ॲपशी मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, शेअर रिक्षा, बाईक टॅक्सी सेवाही जोडण्याचा निर्णय घेतला आहे. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी यासंबंधीची घोषणा केली.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुंबई वन ॲप म्हणजे काय?

    Ans: मुंबई वन ॲप हे मुंबई महानगर प्रदेशातील विविध सार्वजनिक वाहतूक सेवांची तिकिटे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे ॲप आहे. हे ॲप मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केले आहे.

  • Que: मुंबई वन ॲपवरून कोणत्या सेवांची तिकिटे बुक करता येतात?

    Ans: सध्या या ॲपवरून मुंबईतील मेट्रो मार्गिका, उपनगरीय रेल्वे, बेस्ट बस आणि इतर संबंधित महापालिकांच्या बस सेवांसह ११ वाहतूक सेवांची तिकिटे उपलब्ध आहेत.

  • Que: मुंबई वन ॲपवर रिक्षा-टॅक्सी बुकिंगची सुविधा कधी सुरू होणार?

    Ans: एमएमआरडीएच्या नियोजनानुसार, येत्या सहा महिन्यांत ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अॅपमध्ये आवश्यक बदल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Mumbai news mumbai one app rickshaw taxi bike taxi booking service pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • MMRDA
  • Mumbai News
  • smart card

संबंधित बातम्या

Mumbai News: धूळ नियंत्रणात हयगय केल्यास कारवाई! न्यायालयाच्या फटाकेबंदी निर्देशांच्या अमलबजावणीची सूचना
1

Mumbai News: धूळ नियंत्रणात हयगय केल्यास कारवाई! न्यायालयाच्या फटाकेबंदी निर्देशांच्या अमलबजावणीची सूचना

Mumbai Metro 12A : मानपाडा ते तळोजा मेट्रोला मंजुरी! ‘१८.४० किमीचा मार्ग, साडेतीन वर्षांत काम पूर्ण होणार’ – मुख्यमंत्री फडणवीस
2

Mumbai Metro 12A : मानपाडा ते तळोजा मेट्रोला मंजुरी! ‘१८.४० किमीचा मार्ग, साडेतीन वर्षांत काम पूर्ण होणार’ – मुख्यमंत्री फडणवीस

Dadar Kabutarkhana Controversy: कबुतरखाना हवा की आरोग्याची काळजी? नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
3

Dadar Kabutarkhana Controversy: कबुतरखाना हवा की आरोग्याची काळजी? नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

Mumbai News: घाटकोपरमधील खंडोबा टेकडीचे रूपडे पलटणार! महापालिकेकडून ५.७१ कोटींचा विकास आराखडा
4

Mumbai News: घाटकोपरमधील खंडोबा टेकडीचे रूपडे पलटणार! महापालिकेकडून ५.७१ कोटींचा विकास आराखडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.