
धूळ नियंत्रणात हयगय केल्यास कारवाई! न्यायालयाच्या फटाकेबंदी निर्देशांच्या अमलबजावणीची सूचना
Mumbai News: शहरातील बांधकाम स्थळे तसेच लगतच्या रस्त्यांवरील धूळ नियंत्रणाची जबाबदारी पूर्णपणे संबंधित विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांची असून, यामध्ये हयगय करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे सर्व प्रशासकीय विभागांनी काटेकोर पालन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रण, उच्च न्यायालयाचे आदेश आणि वायू गुणवत्ता सुधारणेसंदर्भात पालिका मुख्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त अविनाश काटे, प्रशांत गायकवाड यांच्यासह सर्व परिमंडळीय सहआयुक्त व साहाय्यक आयुक्त उपस्थित होते.(फोटो सौजन्य – AI)
Mumbai News: घाटकोपरमधील खंडोबा टेकडीचे रूपडे पलटणार! महापालिकेकडून ५.७१ कोटींचा विकास आराखडा
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक रस्ते, पदपथ, गल्ल्या तसेच शाळा, रुग्णालये, न्यायालये यांसारख्या शांतता क्षेत्रांत फटाके फोडण्यास पूर्ण बंदी आहे.या निर्देशांची विभाग पातळीवर काटेकोर अंमलबजावणी करावी.प्रदूषणकारी फटाक्यांऐवजी हरित फटाक्यांचा वापर करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि शाळांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
पालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी जारी केलेल्या २८ मुद्द्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची अमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दिसली पाहिजे, याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले. बांधकाम परिसरातून धूळ हवेत पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे विकासकांना बंधनकारक आहे.
‘…त्यांची बुद्धी किती आहे, हे दिसून आले’; मल्लिकार्जुन खरगेंवर Mangal Prabhat Lodha यांचा निशाणा
नियमांचे उल्लंघन आढळल्यास कसलीही तडजोड न करता कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शहरातील वायू गुणवत्ता मापन केंद्रे व सेन्सर नियमित सुरू असावेत. यंत्रणा बंद आढळल्यास किंवा चुकीची आकडेवारी दर्शवल्यास संबंधित यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. रस्त्यांवरील धूळ नियंत्रणासाठी अद्ययावत संयंत्रांचा वापर करून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.