राहुल गांधींच्या टीकेवर रविंद्र चव्हाणांचा पलटवार (Photo - X)
मुंबई : देशाच्या जागतिक प्रतिमेवरून काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या स्थानावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दोन वेगवेगळ्या G20 परिषदांतील छायाचित्रांची तुलना करत त्यांनी राहुल गांधी यांच्या भूमिकेवर निशाणा साधला. (Ravindra Chavan)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या एकत्रित छायाचित्राचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी भारताच्या जागतिक भूमिकेबाबत टीका केली होती.
या टीकेला उत्तर देताना रविंद्र चव्हाण यांनी सोशल मीडियावर दोन छायाचित्रे शेअर केली. 2011 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या G20 परिषदेत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं छायाचित्र आणि 2024 मध्ये रिओ दि जानेरो येथे झालेल्या G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र त्यांनी समोर ठेवलं.
रविंद्र चव्हाण यांनी या दोन्ही फोटोंना ‘2014 पूर्वीचा भारत’ आणि ‘2014 नंतरचा भारत’ अशी शीर्षकं दिली. या माध्यमातून मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा बदलल्याचा दावा त्यांनी केला.
‘दूध का दूध, पानी का पानी’ असं म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या टीकेवर प्रश्न उपस्थित केले. दोन्ही कालखंडांतील छायाचित्रांची तुलना करत भारताच्या जागतिक स्थानाबाबत आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न चव्हाण यांनी केला.
रविंद्र चव्हाण यांनी राहुल गांधींवर टीका करताना सत्तेच्या राजकारणावरही निशाणा साधला. “भूक सहन होईनाशी झाली की आपल्याला त्यापुढे काहीही दिसेनासं होतं. सत्तेच्या भुकेपुढे राहुलजींचीही हीच अवस्था झालीय,” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला.
तसंच, “या भुकेपोटी जर भारताची बदनामी करत सुटाल, तर याद राखा! कोणताही सच्चा भारतीय हे कधीही खपवून घेणार नाही!” असंही त्यांनी म्हटलं.
एकूणच, भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवरून सुरू झालेला हा वाद आता भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय बनला आहे. राहुल गांधींच्या टीकेनंतर रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
Ans: भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
Ans: त्यांनी 2011 मधील फ्रान्स येथे झालेल्या G20 परिषदेत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं छायाचित्र आणि 2024 मधील रिओ दि जानेरो G20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र शेअर केलं.
Ans: 'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका', असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. भारताची बदनामी कोणताही सच्चा भारतीय खपवून घेणार नाही, असंही ते म्हणाले.






