मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ९ तास पाणी, जेवणाविना ठेवले ताटकळत
देशातील प्रतिष्ठित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मधील एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं आढळलं आहे. मृत्यूचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस तपास करत आहेत. विद्यार्थ्याचा मृतदेह तो राहत असलेल्या अपार्टमेंट्च्या खोलीत आढळला आहे. अनुराग जयसवाल असं या मृत विद्यार्थ्याचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. तो लखनऊमधील रहिवासी असून मुंबईत शिकण्यासाठी आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तो मानव संसाधन कार्यक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होता. ही घटना मुंबईच्या घाटकोपर परिसरात घडली आहे.
हेदेखील वाचा- न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच वकिलाचा हार्ट अटॅकने मृत्यू; नागपुरातील घटना
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग काल रात्री त्याच्या मित्रांसोबत बीचवर पार्टीसाठी गेला होता. रात्री उशीरा तो पार्टीवरून परतला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाल्याचं आढळलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अनुरागच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. अनुरागचा मृत्यू रॅगिंगमुळे झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पोलिसांनी यासाठी स्पष्टपणे नकार दिला आहे. याप्रकरणी इतर विद्यार्थ्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशी येथील पाम बीचवर असलेल्या रोअर लाउंज नावाच्या हॉटेलमध्ये काल रात्री पार्टी होती, ज्यामध्ये १२५ विद्यार्थी गेले होते. अनुराग देखील या पार्टीसाठी गेला होता. मात्र सकाळी तो राहत असलेल्या अपार्टमेंच्या खोलीत त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी आम्ही अनेक कनिष्ठ आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले. यानंतर आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो की, अनुरागसोबत रॅगिंग झालेलं नाही. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत मृत्यूचे खरे कारण समजू शकणार नाही.
हेदेखील वाचा- धक्कादायक! लसणाच्या नावाखाली विकल्या जात आहेत सिमेंटच्या पाकळ्या; अकोल्यामधील घटना
पोलिसांनी पुढे सांगितलं की, अनुराग त्याच्या मित्रांसोबत नवी मुंबईतील वाशी येथील पाम बीचवर असलेल्या रोअर लाउंज नावाच्या हॉटेलमध्ये काल रात्री पार्टीसाठी गेला होता. त्यामुळे रात्री असं काय घडलं की त्याचा मृत्यू झाला असावा, याबाबत तपास सुरु आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अनुरागच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.
अनुराग जयस्वाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) चा विद्यार्थी होता. तो मानव संसाधन कार्यक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होता. ज्या अपार्टमेंटमध्ये त्याचा मृतदेह सापडला त्या अपार्टमेंटमध्ये तो भाड्याने राहत होता. अनुरागचे कुटुंब लखनऊमध्ये राहते आणि त्याचे वडील अनुप जयस्वाल मुंबईला रवाना झाले आहेत, ते रात्री उशिरा मुंबईला पोहोचतील. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. विद्यार्थ्याचे कुटुंबीय आल्यानंतर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.