Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार! सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने, रेड अलर्ट जारी

Mumbai Rain: महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. रेल्वे, रस्ते वाहतूक आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला असून प्रशासनाने अनेक भागांत सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 06, 2026 | 08:21 AM
Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार! सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने, रेड अलर्ट जारी

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार! सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने, रेड अलर्ट जारी

Follow Us
Follow Us:
  • मुंबई, पुणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • कर्जत-लोणावळा घाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून अनेक गाड्या रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत.
  • मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Rain Update: मुंबई, पुणे, ठाण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. तसेच ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सखल भागांत पाणी साचू लागले आहे. याशिवाय दृष्यमानता कमी झाल्याने रस्ते वाहतूक देखील उशिराने सुरु आहे. तसेच मुसळधार पावसाचा परिणाम आता रेल्वे वाहतूकीवर देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम, मध्य, हार्बर आणि टान्सहार्बर या सर्व मार्गांवरील वाहतूक आता उशिराने सुरु असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंबईत मुसळधार पावसात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू; महापौर रितू तावडे यांच्याकडून ५ लाखांची मदत, तर किशोरी पेडणेकरांचा थेट हल्ला

लोकल वाहतूक उशीराने सुरु

अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस आणि ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याचे समोर आले आहे. नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर

भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला आज सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आज मुंबईसह अनेक भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आजच्या परिस्थितीचा विचार करता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना आज, सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन सरकारने नागरिकांना केले आहे.

रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

मुसळधार पावसामुळे ६ जुलै २०२६ रोजी मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे वाहतूक कर्जत-लोणावळा घाटात दरड कोसळल्यामुळे पूर्णपणे विस्कळीत आणि स्थगित करण्यात आली आहे. या मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेट किंवा वळवण्यात आल्या असून, मध्य रेल्वेच्या सर्व उपनगरीय (लोकल) फेऱ्यांवरही परिणाम झाला आहे. तसेच, कर्जत-लोणावळा घाट सेक्शनमध्ये (ठाकुरवाडी आणि खंडाळा-मंकी हिल दरम्यान) दरड कोसळल्यामुळे मुंबई आणि पुण्यामधील रेल्वे संपर्क तुटला आहे. दोन्ही मार्गावरील एक्सप्रेस गाड्या रद्द आणि वळवण्यात आल्या आहेत.

कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट?

भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुणे, रायगड, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यासह किनारपट्टीच्या परिसरासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather Update : ‘६ जुलैपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस अन् वादळी…’, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

प्रशासनाचे आवाहन:

पूरसदृश परिस्थिती आणि मुसळधार पावसाचा अंदाज पाहता नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

Web Title: Mumbai rain update heavy rain in mumbai and thane red alert issued local train running late

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • Heavy Rain
  • Mumbai Rain
  • Rain Update

संबंधित बातम्या

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…
1

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
2

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

IND vs SL Live:  गॉलमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच! पहिलं सत्र रद्द, दुसऱ्या सत्रालाही विलंब; सामना कधी सुरू होणार?
3

IND vs SL Live: गॉलमध्ये पावसाची बॅटिंग सुरूच! पहिलं सत्र रद्द, दुसऱ्या सत्रालाही विलंब; सामना कधी सुरू होणार?

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
4

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.