Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात सावध राहा! आर्द्र हवामानामुळे विषाणूजन्य आजारांचा धोका, चार आजारांतील वाढीची सरासरी ५७.६ टक्क्यांवर…

मुंबईत वाढलेल्या आर्द्रतेमुळे पावसाळ्यात विषाणूजन्य संसर्ग आणि अॅलर्जीजन्य आजारांचा धोका वाढला आहे. एच१एन१, डेंग्यू, मलेरिया आणि श्वसनविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 30, 2026 | 12:11 PM
पावसाळ्यात सावध राहा! आर्द्र हवामानामुळे विषाणूजन्य आजारांचा धोका, चार आजारांतील वाढीची सरासरी ५७.६ टक्क्यांवर...

पावसाळ्यात सावध राहा! आर्द्र हवामानामुळे विषाणूजन्य आजारांचा धोका, चार आजारांतील वाढीची सरासरी ५७.६ टक्क्यांवर...

Follow Us
Follow Us:
  • एच१एन१, डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ नोंद.
  • वाढलेल्या आर्द्रतेमुळे दमा, अॅलर्जी आणि इतर श्वसनविकारांचा धोका वाढला.
  • ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मुंबईतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे पावसाळ्यात विषाणूजन्य संसर्ग आणि अॅलर्जीजन्य आजारांचा दुहेरी धोका निर्माण झाला आहे. मलेरिया, डेंग्यू, एच१एन१ आणि विषाणूजन्य अतिसाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच दमा, अॅलर्जिक रायनायटिस आणि इतर श्वसनविकारांच्या तक्रारीही वाढल्या आहेत. सरकारी व खासगी रुग्णालयांतील ओपीडीमध्ये अशा रुग्णांची संख्या गेल्या काही आठवड्यांत वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदत! ज्येष्ठ नागरिक, महिलांना सवलतीत प्रवास करण्यासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड आवश्यक

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, पावसाळ्यात वाढणाऱ्या प्रमुख संसर्गजन्य आजारांमध्ये चिंताजनक वाढ नोंदवली गेली आहे. मलेरियाच्या रुग्णसंख्येत १८.२ टक्के, डेंग्यूमध्ये २७.८ टक्के, लेप्टोस्पायरोसिसमध्ये १५.४ टक्के आणि एच१एन१च्या रुग्णसंख्येत तब्बल १६९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जुनाट आजार असलेल्या व्यक्तींना धोका

सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये फ्लू, इन्फ्लुएंझा, विषाणूजन्य अतिसार तसेच दमा, अॅलर्जिक रायनायटिस आणि अॅलर्जिक ब्राँकायटिसच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. वाढलेली आर्द्रता विषाणूच्या प्रसारासाठी पोषक ठरत असल्याने श्वसनमार्गातील संसर्ग वेगाने पसरत आहेत. त्याचबरोबर घरातील ओलावा, बुरशी, धूळकण, झुरळांचे कण आणि अपुरे वायुवीजन यांमुळे अॅलर्जीच्या तक्रारीमध्येही वाढ होत आहे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, दमा, सीओपीडी किंवा इत्तर जुनाट आजार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक धोका आहे.

शिवडी टीबी रुग्णालयातील माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र तातू ननावरे म्हटले की, “पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता ही विषाणूजन्य संसर्ग आणि अॅलर्जीजन्य श्वसनविकार या दोन्हींसाठी पोषक वातावरण निर्माण करते. वारंवार होणारा खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा अॅलर्जीची लक्षणे याकडे दुर्लक्ष करू नये. घरातील ओलावा व बुरशीवर नियंत्रण, स्वच्छता, वेळेवर निदान आणि आवश्यक लसीकरण यांमुळे अनेक गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकतात”.

रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स, लोकलला बसला जोरदार धक्का; ट्रेन मॅनेजरच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे वाचले प्राण

…तर वैद्यकीय सल्ला घ्या

पावसाळ्यात ताप, सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, अशक्तपणा, नाक वाहणे किंवा बंद होणे, डोळ्यांची खाज, छातीत घरघर, उलट्या होणे किया ऑक्सिजनची पातळी कमी होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai rains humidity viral infections allergy h1n1 dengue malaria health alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • infections
  • Monsoon
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Rabies: कुत्र्याने चावलं नाही, फक्त चाटलं… तरी रेबीजचा धोका? जाणून घ्या धक्कादायक सत्य
1

Rabies: कुत्र्याने चावलं नाही, फक्त चाटलं… तरी रेबीजचा धोका? जाणून घ्या धक्कादायक सत्य

‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन
2

‘संपूर्ण महाराष्ट्रात एक हजार रोजगार मेळावे…’; Mangal Prabhat Lodha यांचे तरुणांना आवाहन

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार
3

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणात आढळले झुरळ; नामांकित डॉक्टरांसोबत घडला धक्कादायक प्रकार

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
4

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.