Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

मुंबईकरांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. शहरातील गेल्या काही काळापासून रखडलेले सायन, विद्याविहार आणि गोरेगाव येथील तीन महत्त्वाचे पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुले करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. हे मार्ग सुरू झाल्यानंतर अनेक भागांतील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 01, 2026 | 11:51 AM
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

Follow Us
Follow Us:
  • ११२ वर्षे जुना सायन रेल्वे पूल १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट
  • आठ वर्षांपासून रखडलेला विद्याविहारचा चारपदरी उड्डाणपूल अखेर पूर्णत्वाकडे
  • गोरेगावच्या नव्या पुलामुळे प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत येण्याची शक्यता
मुंबई शहरातील गेल्या काही काळापासून रखडलेले तीन अत्यंत महत्त्वाचे पूल येत्या ऑक्टोबर महिन्यात एकाच वेळी वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यामध्ये ऑगस्ट २०२४ पासून बंद असलेला सायनचा ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिज, गेल्या आठ वर्षांपासून रखडलेला विद्याविहार उड्डाणपूल आणि गोरेगाव येथील नव्या फ्लायओव्हरचा समावेश आहे. हे तिन्ही मार्ग सुरू झाल्यानंतर पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील वाहतूककोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर निकालात निघणार असून वाहनांचा वेग वाढणार आहे.

CSMTवर ७५ दिवसांचा ब्लॉक; ८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास दादर-ठाण्यातच संपणार

११२ वर्षे जुना रेल्वे पूल सुरक्षेच्या कारणास्तव ठेवला बंद

मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्थानकालगत असलेला ११२ वर्षे जुना रेल्वे पूल सुरक्षेच्या कारणास्तव ऑगस्ट २०२४ पासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. विविध तांत्रिक अडचणींमुळे या पुलाच्या कामाची मुदत दोन वेळा वाढवावी लागली होती. पूल बंद असल्याने सायन, धारावी आणि
एलबीएस मार्गावर दररोज प्रचंड कोडी होत होती. आता हे काम अंतिम टप्यात पोहोचले असून प्रशासनाने येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामुळे परिसरातील वाहनचालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विद्याविहार रेल्वे उड्डाणपूल अखेर पूर्णत्वाकडे

पूर्व उपनगरातील गेल्या आठ वर्षांपासून मुंबईकरांच्या प्रतीक्षेत असलेला विद्याविहार रेल्वे उड्डाणपूलही अखेर पूर्णत्वाकडे पोहोचला आहे. सुमारे १७८ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेला हा चारपदरी पूल सुरू झाल्यानंतर विद्याविहार पूर्व आणि पश्चिमेतील थेट दळणवळण सुलभ होणार आहे. या पुलामुळे घाटकोपर परिसर तसेच सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडवरील वाहतुकीचा अतिरिक्त ताण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

प्रवासाचा वेळ ७५ वरून २५ मिनिटांवर

पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील १.२६ किलोमीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसराला थेट जोडणार आहे. या पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुलाची ‘लोड टेस्ट’ घेतली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत हा पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला केला जाईल. या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या मार्गावरील प्रवासाचा वेळ तब्बल ७५ मिनिटांवरून थेट २५ मिनिटांवर येणार असल्याने प्रवाशांचे तब्बल ५० मिनिटे वाचणार आहेत. सणासुदीच्या तोंडावर हे तिन्ही महत्वाचे मार्ग खुले होत असल्याने मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुकर होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mumbai sion vikhroli goregaon flyovers october 2026 traffic congestion relief nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Mumbai News
  • NAVARASHTRA
  • Road Traffic

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
1

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
2

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर
3

Mumbai News: सर्पदंशाचे मृत्यू निम्म्यावर आणण्यासाठी रोडमॅप! सर्पदंशापासून उपचारापर्यंतची संपूर्ण साखळी मजबूत करण्यावर भर

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
4

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.