‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
या कार्यक्रमादरम्यान मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा नवा आराखडा सादर करताना, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई इन मिनिट्स या संकल्पनेअंतर्गत प्रवास करण्यासाठी ५९ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू नये. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, व्यवसाय व रोजगाराच्या संधी वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. (फोटो सौजन्य – AI Created)
‘माझे घर, माझ्झा हक्क’ या संकल्पनेअंतर्गत नवीन गृहनिर्माण धोरणाबद्दल बोलताना, शिंदे यांनी २०३० पर्यंत कमी उत्पन्न असलेल्या आणि गरजूंसाठी ३५ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट सांगितले. याचा उद्देश शहरातील कामगार आणि इतर गरजू कुटुंबांसाठी घरांची उपलब्धता वाढवणे हा आहे. नवीन विकास योजनेअंतर्गत मुंबईतील सध्याच्या अंदाजे ४५३ हेक्टर मोकळ्या जागांमध्ये ४७९ हेक्टरची भर घालण्याचे लक्ष्य आहे. यामुळे सार्वजनिक मोकळ्या जागांचा विस्तार होईल. खारफुटीचे संवर्धन, सांडपाणी प्रक्रिया, पूर नियंत्रण, हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि प्रदूषण कमी करणाऱ्या सार्वजनिक वाहतूक प्रणालीवरही भर देण्यात आला.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अटल सेतु, नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी आणि दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरला नवीन विकास केंद्रांशी जोडून मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार करण्याच्या योजनांची रूपरेषाही मांडली. अटल सेतूच्या आसपास ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्याच्या प्रक्रियेचा संदर्भ देत ते म्हणाले की, भविष्यातील विकास केवळ दक्षिण, पश्चिम किया पूर्व मुंबईपुरता मर्यादित राहणार नाही. नवीन धोरणांतर्गत, सरकार एकात्मिक योजनेद्वारे वाहतूक, गृहनिर्माण, व्यवसाय, मालवाहतूक आणि रोजगार केंद्रे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
मुंबईला जागतिक वित्तीय तंत्रज्ञान केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, आरोग्यसेवा, मनोरंजन आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये रोजगार वाढवण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे. फिनटेक, ई-कॉमर्स, हेल्थटेक आणि डीपटेक यांसारख्या क्षेत्रांमधील नवीन उद्योगांच्या विस्तारामुळे तरुणांसाठी रोजगार आणि व्यवसायाच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे.






