
Tansa Lake overflows after heavy rainfall
Mumbai Water Shortage : मुंबईकरांची वाढली धाकधूक; सातही तलावांतील पाणीपातळी घसरली
मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्याने भांडुप कॉम्प्लेक्स येथील मास्टर कंट्रोल सेंटरवरून प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अहवालानुसार, बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व सातही तलावांमध्ये मिळून एकूण ८,९५,९०७ दशलक्ष लीटर म्हणजेच ६१.९० टक्के उपयुक्त जलसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी तलावांमध्ये ८५.३२ टक्के तर २०२४ मध्ये ४७.२९ टक्के जलसाठा उपलब्ध होता. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे ५२ मिमी पावसाची नोंद भांडुप कॉम्प्लेक्स परिसरात आज ५२ मिमी पावसाची नोंद झाली असून, या हंगामातील एकूण पाऊस २,००६ मिमी वर पोहोचला आहे, तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास उर्वरित तलावही लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील आणि मुंबईकरांवरील संभावित पाणीकपातीचे संकट पूर्णपणे टळेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.जलाशयांची पाणीपातळी अतिशय झपाट्याने वाढताना दिसत आहे.
कोणत्या धरणात किती जलसाठा ?
मुंबई पालिकेचे ‘विहार’ आणि ‘तुळशी’ हे दोन्ही तलाव १०० टक्के भरले असून, विहार तलाव ७ जुलैच्या रात्री ९:०० वाजता तर तुळशी तलाव त्याच रात्री ११:४३ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर बुधवारी ओव्हरफ्लो झालेला तानसा तलाव सकाळी ६ वाजेपर्यंत ९७.९६ टक्के भरला होता (१,४२,१२२ दशलक्ष लीटर). याशिवाय मोडक सागर तलावात ९०.१२ टक्के (१,१६,१८१ दशलक्ष लीटर) जलसाठा झाला असून तोही लवकरच ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.