Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Handloom Exhibition Mumbai: पैठणीपासून पोचमपल्लीपर्यंत… राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मुंबईत पारंपरिक वस्त्रांचा भव्य उत्सव

Handloom Exhibition Mumbai: राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त नाबार्डतर्फे ५ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबईतील बीकेसी येथे तीन दिवसीय हातमाग प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील १५ GI मानांकन प्राप्त पारंपरिक हातमाग उत्पादनांसह कारागीर आणि ग्राहकांना थेट जोडणारा हा उपक्रम ठरणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2026 | 06:30 PM
पैठणीपासून पोचमपल्लीपर्यंत... राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मुंबईत पारंपरिक वस्त्रांचा भव्य उत्सव

पैठणीपासून पोचमपल्लीपर्यंत... राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मुंबईत पारंपरिक वस्त्रांचा भव्य उत्सव

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मुंबईत पारंपरिक वस्त्रांचा भव्य उत्सव
  • बीकेसीत देशभरातील १५ GI मानांकन प्राप्त हातमाग उत्पादनांचा मेळा
  • नाबार्डचा विशेष उपक्रम
Handloom Exhibition Mumbai: राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त (Handloom Exhibition Mumbai) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) तर्फे ५ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील मुख्य कार्यालयात तीन दिवसीय हातमाग प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या समृद्ध हातमाग परंपरेचे जतन आणि ग्रामीण विणकरांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रदर्शनात देशभरातील १५ GI (भौगोलिक संकेतांक) मानांकन प्राप्त पारंपरिक हातमाग उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. यात महाराष्ट्रची पैठणी, तेलंगणातील पोचमपल्ली इकत, राजस्थानची कोटा डोरिया, ओडिशाची संबलपुरी, बिहारची भागलपूर सिल्क, पश्चिम बंगालची कांथा स्टिच, गुजरातचे कच्छ शाल, आंध्र प्रदेशची वेंकटगिरी, तामिळनाडूची अरनी सिल्क, केरळची बलरामपूरम, उत्तर प्रदेशची मुबारकपूर, हरियाणाची अंबाला हँडलूम्स, मध्य प्रदेशची बाघ, झारखंडची भगैया सिल्क आणि कर्नाटकची उत्तरिया यांसारख्या प्रसिद्ध हातमाग परंपरांचा समावेश आहे.

Mumbai Police Salary Scam: पोलीस दलातील ६.५ कोटींच्या वेतन घोटाळ्यात ५ जणांवर गुन्हा; मंत्रालयातील अधिकारी रडारवर

या मेळाव्याद्वारे ग्राहकांना उत्पादकांकडून थेट अस्सल हातमाग उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मध्यस्थांशिवाय कारागीर आणि विणकरांना थेट बाजारपेठ उपलब्ध होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता खरेदीदार-विक्रेता मेळावा (Buyer-Seller Meet) आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात कारागीर, उत्पादक गट, संस्थात्मक खरेदीदार आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होणार असून, नवीन व्यावसायिक संधी निर्माण करण्याबरोबरच दीर्घकालीन बाजारपेठीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.

नाबार्डने हातमाग क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी GI नोंदणी, कौशल्यविकास, उपजीविका विकास कार्यक्रम तसेच Rural Enterprise Producer Organisations (REPOs) च्या माध्यमातून कारागिरांचे संघटन करण्यासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या उपक्रमांमुळे ग्रामीण उद्योगांना चालना मिळण्यासोबतच भारताच्या समृद्ध हातमाग वारशाचे संवर्धनही होत आहे.

दरवर्षी ७ ऑगस्ट रोजी साजरा होणारा राष्ट्रीय हातमाग दिन हा १९०५ च्या स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ पाळला जातो. भारतीय हातमाग उद्योग, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत हातमाग विणकरांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.

Mumbai News: मेट्रो-६ च्या कारशेडचा तिढा अद्याप कायम! तोडगा न काढताच मेट्रो मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रयत्न

Web Title: Nabard organises three day national handloom day exhibition in mumbai bkc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • bkc
  • Mumbai

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला
1

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन
2

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
3

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

ED Officers Extortion:  ED च्या अधिकाऱ्यांनीन घातला व्यापाऱ्याला 2.25 कोटींचा गंडा; नेमकं घडलं काय?
4

ED Officers Extortion:  ED च्या अधिकाऱ्यांनीन घातला व्यापाऱ्याला 2.25 कोटींचा गंडा; नेमकं घडलं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.